यशवंत ‘ मध्ये ‘हर घर तिरंगा ‘ मोहिमेतंर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

नांदेड:(दि.१५ ऑगस्ट २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या व राष्ट्रीय छात्र सेना यांच्यावतीने दि.१४ ऑगस्ट रोजी “हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” मोहिमेतंर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्यामार्फत ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत रॅली, स्मारकांची स्वच्छता, तिरंगा शपथ तसेच सेल्फी विथ तिरंगा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी हिरवा ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात केली. सदर रॅलीचा मार्ग यशवंत महाविद्यालयात…डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियल.. महात्मा फुले पुतळा… आयटीआय… रेस्ट हाऊस… महात्मा फुले हायस्कूल व परत यशवंत महाविद्यालय असा होता.
यादरम्यान एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. शंकररावजी चव्हाण पुतळा परिसर तसेच महात्मा फुले पुतळा परिसराची स्वच्छता केली.
रॅली दरम्यान तिरंगा ध्वज फडकवित विद्यार्थ्यांनी तिरंगाप्रति निष्ठा वाढविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे, उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, क्रीडा संचालक डॉ.मनोज पैंजणे उपस्थित होते.
तिरंगा रॅली, स्मारक स्वच्छता, आणि सेल्फी विथ तिरंगा या अभियानाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट डॉ. रामराज गावंडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा.राजश्री भोपाळे, प्रा.भारती सुवर्णकार, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.कांचन गायकवाड, प्रा.श्रीराम हुलसुरे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.अजय गव्हाणे तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.