आत्मदहनाचा ईशारा देणार्या ऊस उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज
जिल्हातील ऊस ऊत्पादक शेतकरी कारखानदारी मूळे त्रस्त

मानवत / प्रतिनिधी.
लोणी बुद्रुक येथील शेतकरी मारुती दसरथ गिराम हे शेअर्स धारक योगेश्वरी शुगर लिंबा, सायखेडा कारखाना, रेणुका सुगर्स पाथरी या तिन्ही कारखान्याचे शेअर्स धारक असून हे कारखाने यांचा ऊस नेण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी मारुती दशरथ गिराम यांनी 21 1 2024 पर्यंत ऊसन नेल्यास आत्महत्या करीन असे निवेदन तहसील कार्यालय पाथरी व उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील शेतकरी मारुती दशरथ गिराम यांची जमीन मौजे लोणी बुद्रुक शिवारात गट नंबर 17 मध्ये शेत्र दोन हेक्टर 70आर एवढी असून त्यापैकी एक हेक्टर 40 आर एवढ्या क्षेत्रामध्ये त्यांनी ऊस पिकांची गेल्या वर्षी लागवड केलेली होती तरी ऊस कारखान्यात नेण्यासाठी योगेश्वरी शुगर्स लिंबा, सायखेडा कारखाना, रेणुका शुगर्स पाथरी, या तिन्ही कारखान्यांना नोंदणी केली असता यापैकी सायखेडा कारखाना व योगेश्वरी शुगर लिंबा येथे त्यांच्या नावे शेअर्स देखील आहेत परंतु ऊस नेण्यास ऑक्टोबरचा प्रोग्राम असताना देखील आता जानेवारी महिना आलेला आहे परंतु सदर तिन्ही कारखाने हे त्यांचा ऊस आज उद्या नेऊ असे म्हणत मागील दोन ते तीन महिन्यापासून कारखान्यात टाळाटाळ करत आहेत व आता म्हणतात आम्हाला जेव्हा ऊस न्यायचा असेल तर त्यावेळेस नेहु तुम्हाला कुठे जायचे तर तेथे जा त्यांच्या शेतातील विहिरीचे पाणी हे पूर्णपणे संपलेले असून त्यांचा ऊस सध्या वाळत आहे तरी त्यांच्या उपयोगासाठी सदर शेत जमिनीवरच अवलंबून असून त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे उप जीविकेसाठी दुसरे साधन नाही आर्थिक परिस्थिती खूपच खराब होत चालले आहे तरी त्यांनी योगेश्वरी शुगर लिंबा या कारखान्याला दिनांक 5/1/2024 रोजी कळविले त्यावर सदर कारखान्याने त्यांचा ऊस नेण्यासाठी दिनांक 6/1 2024 रोजी टोळी पाठवली होती परंतु त्यांनी त्यांच्या शेतातील एक हेक्टर 40 आर पैकी फक्त 0 हे 30 आर ऊस एवढाच ऊस कारखान्याला नेला व टोळी दुसऱ्या ठिकाणी नेली परंतु उर्वरित 1 हेक्टर 10 आर ऊस हा सध्या स्थितीत तसाच पडून आहे यावरून असे दिसते की कारखाना त्यांना जाणून-बुजून वेठीस धरत आहे तरी सदरील व्यक्तीने विनंती केली की त्वरित संबंधित कारखान्यांनी आदेशित करून त्यांच्या शेतामधील वाळवून चाललेला ऊस हा दिनांक 21/1/2024 पर्यंत घेऊन जाण्यास आदेशित करावे अन्यथा त्यांचा ऊस न नेल्यास आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही तसेच त्यांनी सांगितले की काही बरे वाईट झाल्यास त्यांचे सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील.
**