किड्स किंग्डम शाळेच्या श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
प्रतिनिधी: नांदेड शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम निकाल देणाऱ्या किड्स किंगडम पब्लिक स्कूलच्या श्री चैतन्य टेक्नो स्कूलने याहीवर्षी सीबीएसई दहावीच्या परीक्षेत १००% निकाल देत यशाची परंपरा कायम राखण्याचा मान ठेवला. त्याबद्दल शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ संपन्न झाला. या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री चैतन्य टेक्नो स्कूलचे एजीएम अन्नदानम शिवकुमार डीजीएम शिवप्रसाद झोनल अकॅडमी कॉर्डिनेटर जयकुमार ,नागेश्वरराव व डॉक्टर श्रीकांत अवचार इंडियन रेवेन्यू सर्विस तसेच श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या प्राचार्य डॉक्टर बलदीप कौर ओबेरॉय यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवणारी विद्यार्थिनी कुमारी भूमी शिवपुजे, द्वितीय नंदकुमार बसवदे, तृतीय वरद कणगिरे, यासह 90% च्या वर मार्क असणारे 27 विद्यार्थी 80% च्या वर मार्क असणारे 41 विद्यार्थ्यांसह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार व मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला पालक वर्गाची उपस्थिती लाभली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक कैलास वानखेडे यांच्यासह शाळेतील अनेक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले