ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये शिक्षण सप्ताह निमित्त विविध खेळ उपक्रम साजरे

मानवत / प्रतिनिधी.

येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक सुभाषरावजी डख यांच्या मार्गदर्शनाखाले शिक्षण सप्ताह निमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात येत असून शिक्षण सप्ताह 22 जुलै ते 28 जुलै कार्येक्रम अंतर्गत आज विद्यालयात क्रिडा दिवसाचे औचित्य साधून मैदानी खेळ अंधळी कोशिंबीर , लंगडी, लिंबू चमचा, शिस्तीत चालणे , अशा प्रकारे विविध मैदानी खेळ हा उपक्रम घेण्यात आला.

यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाषराव डख यांनी मार्गदर्शन केले. क्रिडा दिवसा निमित्त विद्यार्थ्यानी विविध खेळात सहभाग नोंदवीला व कृति करून दाखविल्या कृतीतून शालेय मुलांनी आनंद घेतला.
यावेळी मुख्याध्यापक सुभाषराव डख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून खेळाचे महत्व पटवून सांगीतले.
यावेळी विद्यार्थ्यांनी खेळाचा मनसोक्त आनंद घेतला व विविध खेळामध्ये भरभरून प्रतिसाद दिला यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. सुभाषराव डख, स शिक्षक अनिल चव्हाण सर श्री.सौ. मिनाक्षीताई कहात मॅडम, सोनालीताई माने मॅडम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची यांची यावेळी उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.