ताज्या घडामोडी

पाथरी आगार प्रमूखाचे प्रसिध्दी पत्रक जारी……..* *एक सप्टेंबर ते वीस सप्टेबर मानवत बसस्थानकातून लांब व ग्रामिण भागातील बसफेर्‍या बंद.

मानवत / प्रतिनिधी.

पाथरी आगाराच्या व मानवत बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या संभाजी नगर , सोलापूर , पूणे, व ग्रामिण भागातून पाळोदी मार्ग परभणी या लांब व ग्रामिण भागात जाणार्‍या बसेस आगार प्रमूखाच्या सूचने वरून बंद करण्यात आल्यामूळे प्रवांशा मधून असंतोष पसरत आहे.
सविस्तर वृत्त असे की,

एकूण कमी बसेस वर धावणार्‍या पाथरी आगाराने कोकण वासियासाठी आपल्या आगारातून बसेस पूरविल्या त्यामूळे मानवत बसस्थानकातून लांब व ग्रामिण भागातील फेर्‍या बंद झाल्यामूळे प्रवाशांमधून आगार प्रमूखांच्या कारभारा विषयी संताप व्यक्त केला जात आहे.
रापमने आपल्या लांब पल्ल्याच्या फेर्‍या बंद करून खाजगी प्रवाशी वाहतूकीला रान मोकळे करून दिल्याची चर्चा प्रवाशामधून व्यक्त केल्या जात आहे. तर *छत्रपती – संभाजी नगर, मानवत – पूणे, मानवत – सोलापूर* या फेर्‍यांना मोठ्या प्रमाणात प्रवांशांची गर्दी असून ही ऐन सणाच्या दिवसात बस फेर्‍या गौरी गणपती च्या नावावर कोकणात पाठवून जिल्हातील प्रवाशांना वार्‍यावर सोडल्याची भावना प्रवाशा मधून व्यक्त केल्या जात आहे. कोकणाच्या नावावर चालविलेली दादागीरी प्रवाशी संघटना खपवून घेणार नाही असे मत आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना प्रवाशी संघटनेचे जेष्ट कार्यकर्ते व पदाधिकारी के.डी. वर्मा म्हणाले.
बस फेर्‍या पूर्ववत कराव्यात अन्यथा पाथरी आगाराच्या कारभारा विरोधात लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करावे लागेल असा ईशारा पण यावेळी बोलतांना वर्मा यांनी दिला.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.