ताज्या घडामोडी

चलो आझाद मैदान आपल्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या आंदोलनात सहभागी व्हा !जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे.

मानवत / प्रतिनिधी.

दिनांक १ आक्टोंबर 2024 रोजी आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे तरी परभणी जिल्हातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या न्याय व हक्कासाठी चलो आजाद मैदान मुंबई येथे दिनांक १ आक्टोंबर 2024 रोजी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावा.
असे आवाहन राष्ट्रिय चर्मकार महा संघाच्या वतीने परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी केले आहे. तळागाळातील सर्व समाज बांधवांना माहीतच आहे की काशीरामजी यांनी सांगून गेलेत. *जब जब जुलमी जुल्म करेगा ! गद्दारोसे जंग लढेंगे !!*
तर मग आता वेळ आली आहे आपल्या समाजाच्या अडीअडचणी व अनेक सामाजीक प्रश्न आहेत चर्मकार समाजाला शासकीय योजना पासून मनूवादी हे शासन वंचित ठेवत आहे
मग त्या मनूवादी शासनाला जॉब विचारण्यासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी सर्व चर्मकार बांधवांना दिनांक ०१ ऑक्टोंबर 2024 रोजी आजाद मैदान मुंबई येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे
आणि तीस सप्टेंबर रोजी रेल्वेचे रिझर्वेशन सर्वांनी करावे *सर्वजन एकत्र मिळून जाऊ व मनूवादी शासनाला दाखवून देऊ* मराठवाड्यातील नांदेड परभणी व हिंगोली जालना या चार ही जिल्ह्यामधून समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. परभणी जिल्हातील सर्वात मोठ्या संख्येने दिनांक ०१ आॅक्टोबर रोजी आजाद मैदान येथे उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी केले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.