ताज्या घडामोडी

अर्धापूर तालुक्यातील बामणी या गावी हेरिटेज कंपनीकडून मेळाव्याचे आयोजन

हेरिटेज दूध डेरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी मूर्ती यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अर्धापूर- (प्रतिनिधि-वैभव माटे) तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दूrध व्यवसाय कडे पाहिले जाते तालुक्यातील बहुतांश शेतकरी आपला जोडधंदा म्हणून आपली उपजीविका या वर अवलंबून असते.आज दि.1 रोजी सकाळी अर्धापूर येथील बामणी या गावी हेरिटेज ने या मेळाव्याचे आयोजन केले होते

.यावेळेस उपस्थित हेरिटेज दूध डेरी चे सीइओ संभाजी मूर्ती ,झोनल सत्यनारायण सर नांदेड रिजन हेड, प्लांट मॅनेजर फुलाजी मुंगल , चेअरमन बामणी, आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते.संभाजी मूर्ती यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना दूध वाढीसाठी जनावरांना मोठ्या प्रमाणामध्ये पोषक आहार असणे अत्यंत आवश्यक असते यामध्ये गोठ्याचे व्यवस्थापन, जनावरांना कॅल्शियम ,मिनरलर, सुक्रास पोषक आहार, अशा घटकांचा जनावराच्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करावा व वेळोवेळी गोटा स्वच्छतेकडे लक्ष द्यावे या सर्व दक्षतेमुळे दुधामध्ये वाढ होते व दुधाची गुणवत्ता टिकून राहते व जनावरांना जास्तीत जास्त कोरडा चारा द्यावा अशा अनेक बाबीवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले व उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.बामणी येथील शेतकरी या वेळेस मोठे प्रमाणामध्ये उपस्थित होते व भव्य असा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.