https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कायम स्वरूपी पशुधन विकास अधिकारी नसल्याने पशुपालकांच्या पशूधनावर लंम्पीचे संकट.

कायमस्वरुपी पशुधन विकास वैद्यकिय अधिकारी देण्याची पशूपालकासह शेतकऱ्यांची मागणी

कोल्हा येथील पशु वैद्यकिय दवाखान्यास अधिकारी नसल्याने शेतकरी व पकशुपालक आक्रमक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. कोल्हा येथील पशुवैद्यकिय दवाखाना येथे कायमस्वरुपी पशुधन विकास वैद्यकिय अधिकारी असणे आवश्यक आहे कोल्हा पशु वैद्यकिय दवाखाना श्रेणी -१ अंतर्गत एकूण १६ गावांचा समावेश आहे. परंतु मागील तीन महिन्या पासुन तेथे पशुवैद्यकिय अधिकारी नाही म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे की, येथे कायमस्वरूपी पशुअधिकारी देण्यात यावा. सद्या महाराष्ट्रामध्ये जनावरांना लंपी डिसिज स्किन हा आजार मोठया प्रमाणात झाला आहे व जोमाने पसरत आहे कोल्हा आणि इतर १६ गावात १५० पेक्षा जास्त जनावरांना लंपी हा आजार झाला व त्यापैकी अंदाजे १० जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. लंपी आजारावर मात करण्यासाठी दवाखान्यात मुबलक औषध साठा नाही मागील तीन महिण्यांपासून पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी -१ कोल्हा येथे पशुधन विकास वैद्यकिय अधिकारी नसल्यामुळे जनावरांना उपाचाराची सोय होत नसल्यामुळे त्यांचा बळी जात आहे व तसेच जनावरांना खाजगी दुकानावरून औषध घेण्याकरीता खुप खर्च करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाच्या स्थिती मुळे शेतकरी खूप अडचणीत सापडला असून लंपी या आजारामुळे शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडत आहेत यामुळे शेतकरी चिंतेत आहे तात्काळ पशु वैद्यकिय दवाखाना श्रेणी -१ कोल्हा येथे पशुवैद्यकिय अधिकारी यांची तात्काळ आणि कायमस्वरुपी व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवाच्या वतीने मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हा पशुवर्धन अधिकारी परभणी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे असून निवेदनावर अनेक शेतकरी बांधवाच्या स्वाक्षरी आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704