ताज्या बातम्या
कोल्हा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौजे. कोल्हा येथे दिनांक ०६ डिसेंबर मंगळवार रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरीनिर्वाण दिना निमित्त सह्याद्री आदर्श महिला प्रभाग संघाचा वतीने अभिवादन आले. या वेळी प्रभाग समन्वयक विजय शिंदे, प्रभाग संघ अध्यक्ष मीराताई भिसे, सचिव अनिताताई शिंदे, मिराताई तूपसमुंद्रे, संगीताताई तुपसमुंद्रे, सीमाताई देशमुख, प्रियांकाताई देशमुख, शिल्पाताई निलवर्ण, शालनताई हिंगे, प्रतिभाताई बोडखे, सरस्वतीबाई शिंदे, उर्मिलाताई जाधव, रेणुकाताई रापडवाड, अर्चनाताई मुळे, भाग्यश्रीताई भिसे, सीमाताई भिसे, अनिताताई मांडे यांच्या सह या वेळी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
***