एम सी आर

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम पार्श्वभूमीवर २४ जानेवारी रोजी नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्ट

Uncategorized

नांदेड दि.२२ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त असर्जन परिसरातील मोदी मैदानावर भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पावन शहीदी समागमासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक नांदेड येथे उपस्थित राहणार असल्याने शहर व तालुक्यात मोठी वर्दळ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी तसेच वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक व नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, तसेच कार्यक्रमाचे आयोजन सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडावे, हा यामागील उद्देश आहे.

तरी सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा व धर्म, मानवता आणि बलिदानाच्या या ऐतिहासिक शहीदी समागमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले आहे.
०००००

Share

Related posts

मेंदू विकारग्रस्तांसाठी आरोग्य शिबिर २७ मार्चपासून सुरू

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेसमध्ये प्रकल्प प्रदर्शन उत्साहात* *विद्यार्थ्यांच्या ३८ सॉफ्टवेअर प्रकल्पांचे सादरीकरण

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक — आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये चार्ल्स बॅबेज ॲक्टिव्ह फोरम व डेनिस रिची आयटी क्लबचे दिमाखात उद्घाटन

Chief Editor

यशवंत मध्ये “भारत एन्व्हायरमेंट प्रोग्राम सप्ताहाचे” आयोजन

Chief Editor

नांदेड शहरात 15 व 16 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

Chief Editor

Leave a Comment