नांदेड:( दि. ५ ऑक्टोबर २०२६)
महाराष्ट्र राज्य वेटरन्स एक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजित २७ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्ह्याने ७९ पदके मिळवून पहिले सांघिक विजेतेपद प्राप्त केले आहे.
एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे दि. ३ व ४ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत जलतरणाच्या विविध स्पर्धा प्रकारांमध्ये अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील जलतरणपटूंनी एकूण ७९ सुवर्ण, रौप्य आणि रजत पदके प्राप्त करून जनरल चॅम्पियनशिप खेचून आणली आहे.
ही विजयश्री खेचून आणण्यामध्ये जलतरणपटू अरुण किनगावकर, भास्कर अत्रे, शेखर भावसार, प्रा. ओमप्रकाश गुंजकर, वडदकर, मुगाजी काकडे, पांडुरंग गवते, प्रा.एस.एन.देव, राजेंद्र ताटे, राजेश्वर बोधकुर, प्रमोद कुलथे, बालाजी गाडे, बालाजी वाकोडे, चंद्रकांत लामदाडे, श्री. ध्याडे अप्पा, श्री. भोसले, श्री. भालेकर, श्री. माळोदे, श्री. यशवंतकर यांनी सिंहाचा वाटा उचलला.
केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशामध्ये जलतरण स्पर्धेत यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या नांदेड संघाचे डॉ. अजय गव्हाणे, प्रा. सुभाष बोखारे, प्रा. एस. एम.कुलकर्णी, प्रा.नरेंद्र कंचटवार, लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, डॉ. बी. जी. देशमुख, डॉ. एकनाथ मिरकुटे, डॉ. वीरभद्र स्वामी, खंडू देशमुख, डॉ. सुनील बासटवार, श्री. राठोड, प्रा. अभिनंदन इंगोले, डॉ.मुकुंद कवडे यांनी अभिनंदन केले आहे.
