एम सी आर
Uncategorized

महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्य धर्म स्विकारण्याची गरज-डॉ.भगवानराव वाघमारे

नांदेड: प्रतिनिधी
महात्मा फुले यांचे कार्य बहुजनाच्या हक्क-अधिकार आणि शैक्षणिक रक्षणासाठी होते.ते आयुष्यभर बहुजनांच्या न्यायासाठी लढले असुन त्यांनी धर्मांधता,अंधश्रद्धा, शेटजी-भटजी यांच्या सरंजामशाही आणि धर्म व्यवस्थेच्या विरोधात लढाई केली आहे.सध्याच्या धार्मिक धार्मिक उन्मादाच्या काळात महात्मा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म स्वीकारून समाजाने सत्यवर्तनी जगण्याची गरज असल्याचे मौलिक मार्गदर्शन डॉ.भगवानराव वाघमारे यांनी केले .नांदेड जिल्हा क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महसंघ,लसाकम,जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव दि.२५ एप्रिल रोजी हॉटेल ग्रँड मराठा,छत्रपती चौक,नांदेड येथे आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष लसाकमचे जिल्हाध्यक्ष विजय रणखांब तर, उद्घाटक म्हणून लसाकम चे महासचिव गुणवंत काळे व प्रमुख वक्ते म्हणून विचारवंत प्रा. डॉ.भगवानराव वाघमारे,प्रा.शेख निजाम,योजना मार्गदर्शक म्हणून जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार , आर्टीचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल भालेराव,सत्कारमूर्ती राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे,महिला बाल कल्याण अधिकारी अविनाश खानापूरकर, जिल्हा उद्योग अधिकारी शिवाजी कासारकर,उद्योजक माधवराव डोंपले,प्रा.डॉ.एच.एस.पाटोडे,तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.जी एल. सूर्यवंशी,उपकार्यकारी अभियंता प्रकाश कांबळे उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन लसाकमचे महासचिव गुणवंत काळे यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी आर्टीचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल भालेराव यांनी आर्टीच्या सर्व योजनांची देऊन समाज बांधवांनी आर्टीच्या योजनेचा मातंग समाजाने फायदा घेण्याचे आवाहन केले. तसेच अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी सुद्धा अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या कर्ज प्रकरणाची व योजनांची माहिती दिली.समाज बांधवांनी योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान पवार यांनी केले.यावेळी प्रा.निजाम शेख यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणामध्ये लसाकमचे जिल्हाध्यक्ष विजय रणखांब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार समाजाचे प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजे असे सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी गुंडले तर आभार सचिव पीएम सूर्यवंशी यांनी मानले.

Share

Related posts

कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांना पैठण येथे विनम्र अभिवादन

Chief Editor

हिंदी विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. अनीता दिगंबर सिंह रावत यांचे निधन

Chief Editor

धर्माबाद येथे ग्रंथदान उपक्रम : १६,७३९ रुपयांचे ९० ग्रंथ महाविद्यालयाला भेट

Chief Editor

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये २ ऑगस्टला भव्य शोभायात्रा विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण सत्कार सोहळा

Chief Editor

धनगरवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक युवक शिबिराचे दिमाखदार उद्घाटन

Chief Editor

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त *एम.डी.हॉस्पिटल,नांदेड* येथे *मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

Chief Editor

Leave a Comment