एम सी आर
Uncategorized

नीट पेपरफुटी प्रकरणाचा परिणाम; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

नवी दिल्ली | प्रतिनिधी

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणामुळे विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. काँग्रेस जनता पार्टीसह अनेक विद्यार्थी संघटनांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सातत्याने आंदोलन छेडले होते. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण केले होते.

या सर्व घडामोडींनंतर आज धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत हा लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून अद्याप या राजीनाम्याबाबत अधिकृत सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पुढील शिक्षणमंत्री कोण असतील आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा कोणत्या दिशेने होतील, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

Share

Related posts

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची यशोगाथा; पोलिस भरतीत दोन विद्यार्थिनींची निवड

Chief Editor

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त सुरुवात

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात १९ जून रोजी ‘राष्ट्रीय वाचन दिन’ आणि विद्वत व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठात अभिवादन

Chief Editor

प्रो. राजाराम माने यांच्या संशोधन टीमच्या ‘विषारी वायू शोधक’ उपकरणाला केंद्र सरकारचे पेटंट

Chief Editor

Leave a Comment