https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नसरतपूर-हस्सापुर गट ग्रामपंचायतीची अर्धवट राहिलेली चौकशी इन कॅमेरा व पोलीस संरक्षणाखाली करावी:गोविंदराव सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य

नांदेड : दि ३०
गट ग्रामपंचायत नसरतपुर-हस्सापूर ता. नांदेड येथील नागरीकांना गेली पंधरा वर्षापासुन मुलभूत सुविधा मिळत नसल्यमुळे गावातील नागरीकांनी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार लेखी निवेदने देऊन चौकशीची मागणी केली होती. म्हणून दि. 20.11.2023 रोजी विस्तार अधिकारी श्री.व्हि.बी.कांबळे नसरतपूर-हस्सापूर ग्रामपंचायत कार्यालयात आले हेते. परंतु चौकशी दरम्यान ग्रामपंचायतीचे कोणतेच रेकॉर्ड आमच्यासमोर तपासले नाही आणि ताब्यात घेतले नाही.
तसेच जुने हस्सापूर येथील व्यापारी गाळे तपासण्यात आले असता या वेळी उपसरपंच मारेती जळबाजी काकडे यांच्या ताब्यात असलेली दोन दुकाने व शोभा नवनाथ काकडे ग्रामपंचायत सदस्य यांचे पती नवनाथ काकडे यांच्या ताब्यात असलेले एक दुकान तसेच दुसऱ्या दोन दुकानात मोटार सायकल दुरुस्तीचे गॅरेज हे पाचही दुकाने ताबडतोब बंद करण्यात आले. दुकाने बंद करतानाचे वेळ दिनांकानुसार GPS मध्ये फोटो काढलेले आहेत. मारोतराव काकडे उपसरपंच यांच्या ताब्यात असलेल्या दोन दुकानामध्ये सोयाबीन भरलेले आहे व नवनाथ काकडे यांच्या ताब्यात असलेल्या दुकानात गॅस सिलेंडर भरलेले आहेत. इतर दोन दुकानात मोटार सायकलचे गॅरेज आहे.
सदरील पाचही व्यापारी गाळे सन 2009-2010 मध्ये बांधण्यात आलेले आहेत. सदरील व्यापारी गाळे सरपंच देविदास विठ्ठलराव सरोदे यांनी भाडेतत्वावर दिलेले असून त्यांनी वसूल केलेले भाडे ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर घेतलेले दिसून येत नाही. या व्यापारी गाळ्याच्या भाड्याचे पैसे 2010 पासुन परस्पर सरपंच व उपसरपंच आणि संबंधीत ग्रामसेवकांनी गैरव्यवहार/ भ्रष्टाचार करुन ग्रामपंचायतीचे नुकसान करुन गावातील नागरीकांना पायाभूत सुविधेपासुन वंचित ठेवले आहे. पहाणी करीत असतांना विस्तार अधिकारी यांना दुकानाचे कुलूप काढून पहाणी करण्याची विनंती केली पण त्यांनी या बाबत नकारात्मक भुमिका घेतली.
सदरील चौकशी निपक्षपाती व्हावी म्हणून आम्ही स्वखर्चाने दोन कॅमेरामन लावले होते. गावातील रहिवाशी पुंडलिक महादु भारसावडे, शिवाजी ग्यानोजी भारसावडे व इतर त्यांचे नातेवाईक सदरील दुकाने आमचे आहेत,आमच्या शेतात आहेत, आमच्या दुकानासमोर कोण येऊन कुलूप काढतय! त्यांची बघुन घेतो, आमच्या दुकान व राम मंदिरासमोर कोणीही येऊ नये. अशा धमक्या देऊन अश्लील शिवीगाळ करत अंगावर धाऊन येत होते. हा सर्व प्रकार पाहून परिस्थिती हाता बाहेर जाऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये व आमच्या जिवाच्या भितीने प्रतिभाताई नागेंद्र कांबळे ग्रामपंचायत सदस्य यांनी 112 हेल्प लाईन वजिराबाद पोलीस नांदेड यांना मोबाईलवर बोलावनू घेतले. 112 हेल्प लाईन पोलीसची गाडी गावात आल्यामुळ पुढील अनर्थ टळला. हा सर्व प्रकार सरपंच देविदास सरोदे यांनी दुकानाची व इतर विकास कामाची चौकशी होऊ नये म्हणून, लोकांना चिथावणी देऊन, घडवून आणला आहे.

 

 

 

 

सरपंचानी आणि दुकानाचा काडीमात्र संबंध नसलेल्या नागरीकांनी, वाद घातल्यामुळे विस्तार अधिकारी चौकशी न करताच तसेच कोणताही पंचनामा न करता निघून गेले.
तरी सदरील ग्रामपंचायत नसरतपूर-हस्सापूर ता.नांदेडची संबंधीत अधिकाऱ्यांनी (प्रशासनाने) चौकशी करुन नागरीकांना न्याय द्यावा अन्यथा आम्हाला अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704