आज मानवतकरांना सूर्य दर्शन नाही.

mcr news / manawt
     {अनिल चव्हाण }
मानवत आज भल्या पाहटे पासूनच मानवत तालूक्यासह शहरात पावसाचे आगमन झाले. त्यामूळे जनजिवन विस्कळीत झाले.
आज दिनांक १४ सप्टेर रोजी सकाळ पासूनच वरून राजाने हजरी लावली त्यामुळे तालूक्यासह शहरी भागातील नागरिकांचे जनजिवन विस्कळीत झाले. हवामान विभागाने ३ दिवस पावसाचे संकेत दिले असल्यामुळे नागरिकांनी बाहेरचा प्रवास करण्याचे टाळल्याचे बोलल्या जात आहे. अनेक बसेस कमी प्रवाशी घेऊन आपल्या फेर्या पूर्ण करतांना पाहावयास मिळत आहे. तर पावसामूळे शेतकरी व पशुपालक यांना सूध्दा फटका बसला.
शहरातील व्यापार पेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.
तर क्रिकेट प्रेमी युवकामध्ये पाण्यात खेळण्याचा आनंद घेत आपला उत्साहात भर टाकत आनंद घेतला.
सतत पडत असलेल्या पावसामुळे मात्र शेतकर्यांचे  मोठे अर्थीक नूकसान झाले आहे.
करणी सेनेच्या वतीने नूकसाणीचे सरसकट अनूदान देऊन मदत करावी अशी मागणी राम दहे पाटील यांनी केली आहे.
..
				
					


