व्यक्ती ते सृष्टीची यंत्रणा म्हणजे एकात्म मानव दर्शन-* पद्मश्री कर्मवीर दादा इदाते
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय परिसंवाद उत्साहात संपन्न

नांदेड:
संयमित उपभोग आणि गौरवपूर्ण जीवन: उपभोग संयमित असावा. तसेच प्रत्येक मानवाला गौरवपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार असावे. ‘शोषण नव्हे, दोहन’ आणि ‘अंत्योदय’ची संकल्पना: शोषण नव्हे तर दोहन (संसाधनांचा वापर) आणि अंत्योदय (समाजातील शेवटच्या व्यक्तीचा उदय) या संकल्पना अत्यंत सहज होतो. ज्यामुळे सामाजिक न्यायाचा आधार अधोरेखित झाला. शाश्वत विकास आणि सार्वत्रिक सत्य: पंडित दीनदयाळ यांच्या एकात्म मानव दर्शन तत्त्वज्ञानाचे सार वर्तमान आणि भविष्यकालीन शाश्वत विकास, सामाजिक न्याय आणि सार्वत्रिक सत्य या संदर्भाने त्यांनी अधोरेखित केले. ‘Vocal for Local and Local for Global’ चा महत्त्वपूर्ण नारा दिला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘एकात्म मानव दर्शन : शाश्वत विकास, सामाजिक न्याय आणि राष्ट्र उभारणीसाठी एक समग्र तत्त्वज्ञान’ या विषयावर राज्यस्तरीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिसंवादात दादा इदाते यांनी आपल्या भाषणात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या या महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानाचे सार सोप्या भाषेत पोहोचवले. दादा इदाते यांनी स्पष्ट केले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे एकात्म मानव दर्शन म्हणजे ‘व्यक्ती ते सृष्टीची यंत्रणा’ होय, जे जीवनाच्या प्रत्येक स्तरावर एकात्मता आणि समरूपता दर्शवते. हे तत्त्वज्ञान राष्ट्र उभारणीसाठी कसे महत्त्वपूर्ण ठरू शकते, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
या राज्यस्तरीय परिसंवादामुळे युवा पिढीला एकात्म मानव दर्शनाचे लोककल्याणकारी विचार आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली. या परिसंवादात डॉ. राम मंठाळकर यांचेही बीजभाषण झाले. या परिसंवादाचे अध्यक्ष मा. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्रमुख उपस्थिती मा. प्र-कुलगुरू अशोक महाजन, डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. संतराम मुंडे, डॉ. संगीता माकोने, प्र. कुलसचिव डॉ. एम. के. पाटील. अधिष्ठाता डॉ. पराग खडके, डॉ. जगदीश कुलकर्णी. डॉ. मारुती गायकवाड, प्राध्यापक, विद्यार्थी आणि नांदेड परिसरातील सन्माननीय नागरिक यांची लक्षणीय उपस्थिती होती. होते. समन्वयक डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांनी प्रास्ताविक केले व आभार प्रदर्शन शिक्षणशास्त्र संकुल संचालक डॉ. वैजयंता पाटील यांनी केले.



