यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम

नांदेड (प्रतिनिधी) – देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लोखंडपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विभागीय केंद्र, नांदेड येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सरदार पटेल यांनी स्वातंत्र्योत्तर भारताचे एकीकरण घडवून राष्ट्राच्या ऐक्याचा पाया मजबूत केला. त्यांच्या दूरदृष्टी आणि कठोर निर्णयक्षमतेमुळे भारत एक अखंड राष्ट्र म्हणून उभा राहिला.
इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. त्यांनी 1966 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारून जवळपास 15 वर्षे देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या धाडसी निर्णयांमुळे आणि ठाम नेतृत्वामुळे भारताच्या राजकीय इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे.
या कार्यक्रमात विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ यशवंत कलेपवार तसेच दिलीप थोरात, शेखर जगताप,विकास पावडे, नितेश देशमाने, माधव वैद्य, माधव गिरे, नागनाथ टोनगे,मुंजाजी कदम, आईन्स्टाईन मुंडे, मिलिंद जोगदंड, सुमनबाई लुटे. . उपस्थितांनी दोन्ही महान नेत्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.



