ताज्या घडामोडी
दैनिक लोकमत दिवाळी अंकाबाबत ‘यशवंत ‘ चे प्राचार्यांचे गौरवोद्गार

नांदेड:( दि.३१ ऑक्टोबर २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील विद्यमान प्राचार्य आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे माजी प्र-कुलगुरु डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांना दैनिक लोकमतचा दीपोत्सव दिवाळी अंक:२०२५ सस्नेह भेट देऊन राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी दीपावलीनिमित्त वैचारिक मेजवानी आणि हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, दैनिक लोकमत परिवार हे केवळ महाराष्ट्रच नाही तर सर्व देशभर वृत्त, लेख, संपादकीय आणि मानवी जीवनाशी संबंधित विविध बाबींची अद्ययावत माहिती वाचकांना देत असते. दैनिक लोकमतचा प्रत्येक वर्षीचा दिवाळी अंक हा दर्जेदार असून प्रत्येक वाचकाने हा अंक संग्रह ठेवावा असा आहे, असे मनोगत व्यक्त केले.



