एम सी आर
Uncategorized

घरफोडी प्रकरणातील आरोपी १२ तासांत जेरबंद; १९.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पाच आरोपींना अटक करून तब्बल ₹१९,६१,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक ८९/२०२६ अंतर्गत कारवाई केली. घरफोडी प्रकरणातील आरोपी तुळजापूर येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तातडीने सापळा रचून दोन पुरुष व तीन महिलांना ताब्यात घेतले.

अटक आरोपी

अटक करण्यात आलेल्यांमध्ये आनंद नामदेवराव जाधव (२७), राजेश लक्ष्मण पांचाळ (२३), पूजा दीपक नरवडे (२६), स्मिता लक्ष्मण पांढरे (२८) आणि संध्या किशनराव डोंगे (२९) यांचा समावेश आहे.

जप्त मुद्देमाल

पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला —

रोख रक्कम : ₹१२,५०,०००

सोन्याचे दागिने (७ ग्रॅम) : ₹१,०५,०००

चांदीचे दागिने : ₹४०,०००

बेंटेक्स दागिने

गुन्ह्यात वापरलेली कार : ₹५,००,०००

स्कुटी : ₹६५,०००

Share

Related posts

नांदेड जिल्हा रेशीम हब बनविणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले*

Chief Editor

महाराष्ट्रात 3 दिवस दुखवटा…. सुट्टी जाहीर

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतार दिन उत्साहात साजरा

Chief Editor

यशवंत ‘ भारत एन्व्हॉर्मेंट प्रोग्रामद्वारे राष्ट्रस्तरीय प्लॅटिनम गोल्ड पारितोषिकाने सन्मानित

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठामध्ये महाड सत्यागृह शताब्दी व जयंती महोत्सव उत्साहात

Chief Editor

Leave a Comment