एम सी आर

ज्ञानतीर्थ २०२६ : कलावंतांकडून माध्यमांच्या कार्याचे कौतुक

Uncategorized

नांदेड: प्रवीण कुमार सेलूकर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ २०२६’ अंतर्गत महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, नृत्य, नाट्य, संगीत, वाङ्मय आणि ललित कला अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या विविध बातम्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सायन्स कॉलेजमधील डॉ. उल्हास पत्की यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
सायन्स कॉलेजमधील डॉ. उल्हास पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या डॉ. दिपा बोगले, प्रा. विवेकानंद दराडे, अमोल कुलकर्णी, वैष्णवी राजुरकर, लता ताटेवाड यांनी माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना महोत्सवातील विविध घडामोडींची माहिती मिळावी, तसेच माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांच्या माध्यमातून महोत्सवाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचावी, या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
कार्यामुळे महोत्सवातील घडामोडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Share

Related posts

मराठी रोजगाराभिमुख भाषा -पत्रकार व कथाकार राम तरटे

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘प्रगत आण्विक जीवशास्त्र’ प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

Chief Editor

लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम *प्राचार्य डॉ. गणेश जोशी

Chief Editor

Chief Editor

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विजयी*

Chief Editor

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांनी केली -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

Leave a Comment