एम सी आर

मराठी रोजगाराभिमुख भाषा -पत्रकार व कथाकार राम तरटे

Uncategorized

*
नांदेड(दि. ५ ऑगस्ट २०२६)
मराठी भाषेमध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असून पत्रकारितेमध्ये आणि लेखन क्षेत्रामध्ये मराठीच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत; त्यामुळे मराठी रोजगाराभिमुख भाषा असल्याचे मत पत्रकार तथा प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी व्यक्त केले.
यशवंत महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने उद्बोधन वर्गास संबोधित करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते.
पुढे बोलताना श्री राम तरटे म्हणाले की, मराठी भाषेमध्ये कथालेखनात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहे. मुद्रित शोधन हा सुद्धा रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असल्याचे मत त्यांनी मांडले. शिवाय कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी साहित्य व भाषेचा वाटा हा महत्त्वाचा असतो; याबद्दलही मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी बारा आण्याची बोंब ही विनोदी कथा अत्यंत खुमासदार शैलीत सादर केली.
अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, भारतामध्ये शिक्षा आणि दीक्षा हे दोन महत्त्वपूर्ण घटक प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना या दोन घटकांबरोबरच तंत्रज्ञान, बहुविद्याशाखीय अध्ययन आणि सर्वांगीण विकास हे तत्वही आवर्जून स्वीकारण्याची गरज आहे. यशवंत महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन परिपूर्ण व्हावे; अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेषतः ग्रंथालय हे ग्रंथांनी आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असून ई- बुकचा वापर विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन केले.
प्रारंभी प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. संजय जगताप यांनी केले. मराठी विभागाचा परिचय डॉ. विश्वाधार देशमुख यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. प्रज्ञा इंगोले, प्रमुख अतिथींचा परिचय कु. गोदावरी कानशुक्ले तर शेवटी आभार डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी मानले.
कार्यक्रमास राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे, डॉ. रंगनाथ नवघडे, डॉ. मीना कदम यांची प्रामुख्याने उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. गोदावरी कानशुक्ले, संकेत कदम, कृष्णा गव्हाणे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले तसेच प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांना पैठण येथे विनम्र अभिवादन

Chief Editor

नितीन गायकवाड यांची अमरावती विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

Chief Editor

स्वा.रा.ती.म. विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रात ‘डेव्हलपमेंट स्टडीज’ पदविका अभ्यासक्रम सुरू – डॉ. महेश मगर

Chief Editor

जय हिंद पब्लिक स्कूलच्या सांस्कृतिक महोत्सवास उदंड प्रतिसाद

Chief Editor

यशवंत महाविद्यालयात समाजशास्त्र अभ्यास मंडळ स्थापना व अतिथी व्याख्यानाचे आयोजन.

Chief Editor

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Chief Editor

Leave a Comment