एम सी आर
Uncategorized

जय हिंद पब्लिक स्कूलच्या सांस्कृतिक महोत्सवास उदंड प्रतिसाद

—————————————–
उदगीर :-येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये शै.वर्ष 2025-26 च्या वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक महोत्सव 2026 ला विद्यार्थ्याचा उदंड प्रतिसाद मिळाला.या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन 3 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध फार्मा उद्योजक प्रकाश साखरे यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप तर प्रमुख उपस्थिती म्हणून स्टार प्रवाह फेम एक टप्पा आऊट चे विजेते बालाजी सूळ, भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा उत्तराताई कलबुर्गी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी व जय हिंद पब्लिक स्कूलच्या प्राचार्या ज्योती स्वामी, संस्थेच्या एच.आर मॅनेजर स्नेहा लांडगे, जय हिंद ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गणेश तोलसरवाड, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, नर्सिंग कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या प्रिन्सी बी, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, उपप्राचार्य गणेश नागुरण, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संजय हट्टे, समन्वयक सतीश वाघमारे, समन्वयक भाग्यश्री वांगवड, समन्वयक धोंडीबा शिंदे, समन्वयक अमित सोनकांबळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
सदरील सांस्कृतिक महोत्सव हा 03 व 04 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध देशपर, आदिवासी, भक्तीगीत, बॉलीवूड गीत यावर एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करीत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
हा सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share

Related posts

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वारातीम विद्यापीठात वृक्षारोपण उपक्रम संपन्न

Chief Editor

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने विद्यापीठात ‘पीएच.डी. एंड-टू-एंड’ सॉफ्टवेअर पोर्टलचा शुभारंभ

Chief Editor

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी

Chief Editor

मालकाला सूचना न देता वृक्षतोड व नाली खोदकाम;मनपा अधिकाऱ्यांविरोधात आयुक्तांकडे तक्रार

Chief Editor

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Chief Editor

ग्रामीण मातंग स्त्री ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार

Chief Editor

Leave a Comment