ज्ञानतीर्थ २०२६ युवक महोत्सवात वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या लावणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ २०२६’ मध्ये वसंतराव नाईक महाविद्यालय, वसरणी, नांदेड येथील बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु.दीपाली अविनाश वाघमारे हिने ‘घ्याल का हो राया, एक शालू बनारसी’ या पारंपरिक लावणीचे बहारदार सादरीकरण केले. तिच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपणाऱ्या लावणी या कलाप्रकारातून दीपालीने आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. लावणीतील ठसकेबाज अदाकारी, तालबद्ध सादरीकरण आणि पारंपरिक लोककलेची मोहकता यांमुळे तिच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या सादरीकरणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संघ व्यवस्थापक म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. साहेबराव शिंदे, प्रा. कविता हंबर्डे, डॉ. शोभा वाळूकर आणि डॉ. पंढरी गड्डपवार यांनी संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली.
या प्रसंगी डॉ. गणेश इजळकर, प्रा. नितीन मुंडलोड, प्रा. अश्विनी जगताप, प्रा. डोंगरे, प्रा. राहुल पडोळे, डॉ. कपिल हिंगोले आणि डॉ. राहुल सरोदे यांची उपस्थिती होती.
युवक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला, प्रतिभा आणि सांस्कृतिक कौशल्ये सादर करण्याची संधी मिळत असून, अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचे संवर्धन आणि जतन होण्यास मदत होत आहे.
दीपाली अविनाश वाघमारे हिच्या बहारदार लावणी सादरीकरणामुळे वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली.
