https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्राईम

गडचिरोली सायबर पोलिसांनी शोधले ४९ मोबाईल

गडचिरोली,प्रतिनिधी :-

जिल्ह्यात हरवलेले मोबाईल शोधुन काढण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश मिळाले असून येथील सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली कडुन शोध घेतलेल्या ४९ मोबाईलचे वाटप करण्यात आले आहे.

तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असून मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबधीत पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली जाते. सदर तक्रार बाबत सायबर पोलीस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.

मोबाईल हरविले किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्तीत जास्त शक्यता असल्यामुळे हरविले किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. या बाबीचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन मार्फत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो.

सन २०२२ या वर्षात एकुण १५० मोबाईल ज्यांची किंमत जवळपास २२ लाख रुपये एवढ्या किंमतीच्या मोबाईलचा शोध सायबर पोलीस स्टेशन मार्फत घेवून ते मोबाईल संबंधीत व्यक्ती यांना देण्यात आले. तसेच सन २०२३ मध्ये एकुण ४९ मोबाईलचे वाटप करण्यात आले असुन अंदाजे किंमत एकुण ७.५० लाख रुपये एवढी आहे.

 पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते ३१ मोबाईल संबधीत मोबाईल धारकांना  प्रदान करण्यात आले.सदर सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी उल्हास भुसारी, पोउपनि श्री. निलेश ठाकरे, पोउपनि निलेश वाघ व पोलीस अंमलदार मनापो वर्षा बहिरवार, मनापोअं संगणी दुर्गे, मनापोअं. गायत्री नैताम, मपोअं. किरण रोहणकर, पोअं. योगेश खोब्रागडे, पोअं. सचिन नैताम यांनी पार पाडली. 

सध्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असून, सायबर गुन्हेगारामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून फसवणुक केली जाते. त्यामुळे जनतेनी सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे व आपल्यासोबत काही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा.

– पोलीस अधीक्षक नीलोत्पल

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704