स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्याने पटकावले सुवर्ण पदक

स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्याने पटकावले सुवर्ण पद
———————————————-
उदगीर : – येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथील बी. एससी कॉम्प्युटर सायन्स प्रथम वर्षात शिकणाऱ्या चंद्रकात हणमंतराव केंद्र या विद्यार्थ्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व शिवछत्रपती महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बी झोन शरीर सौष्ठवस्पर्धेत 65 वजन गटात सुवर्ण पदक पटकावत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
सदरील विद्यार्थ्याने शरीर सौष्ठव स्पर्धेत महाविद्यालयास पहिल्यांदाच मिळवलेल्या सुवर्ण पदक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप,संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, संस्थेच्या मनुष्यबळ विकास अधिकारी स्नेहा लांडगे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, क्रीडा प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, संगणकशास्त्र विभागाचे प्रभारी प्रा. राशेद दायमी,प्रा.आसिफ दायमी, प्रा. उस्ताद मोहम्मद, प्रा. वैष्णवी गुंडरे, प्रा. नावेद मणियार, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा. रोशनी वाघमारे, प्रा. शीतल तोगरीकर, प्रा. सचिन तोगरीकर, प्रा.अंजली रविकुमार, प्रा.पूजा माने, महेश हुलसुरे, सादिक शेख, काजल सांगवे, अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, बायडी वाघमारे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.