जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचे फूटबॉल स्पर्धेत यश

उदगीर : – येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थिनी नी देवर्जन येथे नुकतीच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय फूटबॉल स्पर्धा मध्ये यश प्राप्त करीत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये स्थान मिळवले आहे.
सदरील स्पर्धेमध्ये 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थिनी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय फूटबॉल स्पर्धेत कादंबरी मोहेकर, ज्योत्स्ना चिरंगे, मोनिका माहूरे, वैशाली सरकुंडे, पूनम निरडे, वैदिका खुपसे, वैशाली देशमुखे, सपना डाकरे, वंदना कुरुडे, भाग्यश्री मिरासे, प्रतीक्षा वागतकर, सपना नाईक, सुजाता फोले, रुक्मिणी वागतकर यांनी अंतिम सामन्यांत अटी-टती च्या लढतीत उत्तम खेळ करित यश संपादन केले व जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी प्राप्त ठरले आहे.
विद्यार्थिनीनी मिळवलेल्या विजया बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप,संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी तथा स्कूलच्या व्यवस्थापिका ज्योती स्वामी, जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्या कृष्णा कथुरिया, उपप्राचार्य रिंग्नम विश्वकर्मा, सतिश वाघमारे, नबेट समन्वयक मनोरमा शास्त्री, अजित जाधव, भाग्यश्री वंगवाड, फिरोज आत्तार, आश्लेषा गडदे यांनी अभिनंदन केले.