ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची स्पर्धा संपन्न

नांदेड:( दि.२६ ऑगस्ट २०२५)
यशवंत महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र विभागातर्फे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पदवी व पदव्युतर विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी स्पर्धेचे उद्घघाटक व अध्यक्ष उपप्राचार्या डॉ.कविता जी. सोनकांबळे होत्या.
यावेळी त्यांनी पर्यावरणपूरक गणपती हे निसर्गाच्या रक्षणासाठी आवश्यक आहेत. मूर्ती मातीची, रंग नैसर्गिक आणि सजावट सेंद्रिय ठेवल्याने जलप्रदूषण आणि प्लास्टिकचा वापर टाळता येतो. असे सण निसर्गस्नेही पद्धतीने साजरे केल्यास पर्यावरणाची हानी न होता संस्कृती जपली जाते, असे अध्यक्षीय भाषणात सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ.बी.बालाजीराव यांनी केले. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरल्याने नैतिक वापर आणि संसाधनांच्या वापरामध्ये शाश्वतता सुनिश्चित होते, याविषयी मार्गदर्शन केले.
स्पर्धेमध्ये पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या स्पर्धेत प्रथम प्रेमराज ढवळे, द्वितीय सुमय्या तबसून व तृतीय समीक्षा सावते यांनी पारितोषिक पटकावले. सहभागी विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
सूत्रसंचालन पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा.अरविंद शिंदे यांनी केले आणि आभार प्रा.कांचन पांचाळ यांनी मानले.
याप्रसंगी संशोधक विद्यार्थी नंदकुमार गच्चे, दुग्धशास्त्र विषयाचे प्रा. बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अभिनंदन कदम यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.