श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय, आर्धापूर येथे संशोधन पद्धतीवर व्याख्यानाचे आयोजन

(आर्धापूर) दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय, आर्धापूर येथे IQAC व रिसर्च इन्क्युबेशन सेल (RIC) यांच्या संयुक्त विद्यमाने “संशोधनातील गृहीतक : शोधाचा दिशा निर्देशक” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालया प्रभारी प्राचार्य डॉ. साईनाथ शेठोड यांनी भूषविले.
प्रमुख वक्ते डॉ. एस. ए. मुळे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर) यांनी गृहीतक म्हणजे संशोधनाचा दिशा निर्देशक असल्याचे सांगून त्याचे स्वरूप, प्रकार व संशोधनातील महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
गृहीतक संशोधनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात, विश्लेषण सुलभ करण्यात व प्रत्यक्ष आयुष्यात परिणामकारक निष्कर्ष साधण्यात कसे उपयुक्त ठरते हे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच डॉ. मोहन बंडे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख, मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजनी) यांनी संशोधन पद्धतीतील विविध नवनवीन दृष्टिकोन व अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.
या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना संशोधनाविषयी उत्सुकता निर्माण होऊन नवनवीन कल्पना विकसित करण्यास प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.