एम सी आर
Uncategorized

स्वामी विवेकानंद संकुलात रक्तदान शिबिराचे आयोजन

——————————————–
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर या संस्थेच्या 28 व्या वर्धापन दिन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त स्वामी विवेकानंद संकुलात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन स्वामी विवेकानंद महाविद्यालतील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नागप्‍पा अंबरखाने ब्लड बँक उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय,नर्सिंग कॉलेज उदगीर, अध्यापक महाविद्यालय, जय हिंद पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकानी व शिक्षकेत्तेर कर्मचाऱ्यांनी या शिबिरात उत्स्फुर्तपणे सहभाग घेत 51 जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरासाठी संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, संस्थेचे एच.आर मॅनेजर स्नेहा लांडगे,राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी व रक्तदान शिबिराचे संयोजक प्रा. अमर तांदळे, ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. बसवराज शेटकार,प्राचार्य डॉ.गोपाळ पवार, प्राचार्य डॉ.गणेश तोलसरवाड, प्राचार्य संजय हट्टे, प्र.प्राचार्या प्रिन्सी बी, उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, प्रा.राशेद दायमी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा.असिफ दायमी, प्रा.वैष्णवी गुंडरे, प्रा.नम्रता कुलकर्णी,प्रा.रोहिणी वाघमारे,प्रा.नावेद मणियार, प्रा.पूजा माने, प्रा.सायमा पटेल, प्रा.सचिन तोगरिकर, प्रा. अंजली रविकुमार, शीतल तोगरिकर, काजल सांगवे, उषा गायकवाड, विद्यार्थी कल्याण मंडळाची सचिव प्रतीक्षा बिरादार, अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, वैभव बिडवे, संदेश गवळे, महेश हुलसुरे ब्लड बँक चे कर्मचारी सचिन कोनाळे, सोमनाथ स्वामी, सपना कांबळे, हर्षद महाजन, श्रद्धा हसुरे, विनायक टकटवले, संगमेश स्वामी यांनी परिश्रम घेतले.

Share

Related posts

महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्य धर्म स्विकारण्याची गरज-डॉ.भगवानराव वाघमारे

Chief Editor

योग ही विज्ञाननिष्ठ संकल्पना -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये जिल्हास्तरीय देशभक्तीपर एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन

Chief Editor

नितीन गायकवाड यांची अमरावती विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

Chief Editor

नांदेड महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्र. 10 (अ) मधून ॲड. ज्ञानेश्वर धडके यांचा सर्वांगीण विकासाचा निर्धार

Chief Editor

नशामुक्त युवा – विकसित भारत’ जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

Leave a Comment