https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील शासकीय मुलींचे वसतिगृहात संविधान दिन उत्सहात साजरा

मानवत / प्रतिनिधी.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह मानवत येथे २६ नोव्हेंबर ” संविधान दिवस ” दिन उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी गृहव्यवस्थापक शितल रणबहारे, आरती गायकवाड तसेच विद्यार्थिनी कर्मचारी महीला मोठया संख्येने उपस्थित होत्या. भारतीय राज्यघटनेचा अर्थ समजून घेऊन त्या नुसार समाजातील उपेक्षित घटकांसाठी सातत्याने कार्य करणे आवश्यक आहे, ‘‘जगात आपल्या देशाची राज्यघटना सर्वोत्कृष्ट असून त्यातून राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याचे मौल्यवान काम होत आहे,’’ असे मत यावेळी विदयार्थीनी व्यक्त केले. या वेळी राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी प्रभारी गृहपाल शितल रनबहारे यांनी आज २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशासाठी खुप महत्वाचा आहे. २६ नोव्हेंबर १९४९ साली आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला होता. त्यामुळे या दिवशी म्हणजेच २६ नोव्हेंबरला संविधान दिन म्हनून साजरा केला जातो असे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले. तर गृहव्यवस्थापक आरती गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करत म्हटले की भारताचे संविधान तयार करण्यात महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा असुन म्हणूनच २६ नोव्हेंबर हा दिवस हा कायदा दिवस म्हणून देखिल साजरा केला जातो यावेळी कार्यक्रमास वसतिगृहा तील विदयार्थीनी व कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704