https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

साहित्याचा महोत्सव:एक वारकरी-लैलेशा भुरे

बघितला दूर एक घोळका लोकांचा
विचार मनात आला
काय हेतू असेल त्यांचा?
थोड्या वेळातच वाढला कोलाहल तिथे
मी अंदाज बांधला संकटाचा

डोकावून पाहिले मी गर्दीत थोडे
आवाज वाढत होता तेथे भांडण्याचा
तुकोबाची पालखी चालली होती रस्त्याने
चहुबाजूस घुमत होता नाद विठ्ठलाचा


नकळत भान हरपता एका वारक-याचे
दुस-याच्या पायावर पडला होता पाय चपलेचा
इतके क्षुल्लक कारण ठरले भांडायला
जात-पात, धर्म खोदला त्या बापड्याचा

हात जोडून त्याने मागितली माफी
तरीही थांबला ना धुडगुस भांडणाचा
लोकांनी तुडवले त्या बिचाऱ्याला
उगा झाला असा वध सभ्यतेचा

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704