मानवत पंचायत समितीचे शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून शिरिषजी लोहट यांची निवड
*
*
मानवत / प्रतिनिधी.
मानवत पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डी.आर.रणमाळे हे दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्याने शिक्षण विस्तार अधिकारी हे पद रिक्त होते.
आज त्या पदावर ज्येष्ठ केंद्रप्रमुख शिरीष लोहट यांच्याकडे तो पदभार मानवतचे गट शिक्षणाधिकारी मुकेश राठोड यांनी सोपवला. एक प्रकारे आता पर्यंत शिरीष लोहट यांनी केलेल्या कामाचा हा सन्मान आहे अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून ऐकावयास मिळाल्या.
शिक्षण विस्तार अधिकारी पदी नियुक्ती बद्दल शिरीष लोहट यांचा गटसाधन केंद्रात गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड व गटसाधन केंद्रातील कर्मचारी बांधव आणि शिक्षक मित्रांनी यावेळी सत्कार करून सन्मान करण्यात आला.
यावेळी गटसाधन केंद्रातील आत्माराम पाटील, राजकुमार गाडे, दिगांबर गिरी,प्रतोद बोरीकर, गजानन वांबूरकर, सिमा सिसोदिया, दत्ता सहाणे,जनार्दन कदम, केंद्रप्रमुख विलास लांडगे, मुख्याध्यापक रंगनाथ मोरे, शिक्षक मित्र विलास खरात, राजेश चव्हाण, विशाल कोल्हे, भानुदास वराट तसेच ग्यानप्रकाश फाऊंडेशनचे संदीप जगताप व पांडूरंग सर उपस्थित होते.
या नियुक्ती बद्दल शिरिष लोहट यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
***