ताज्या घडामोडी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करावेत -कुलगुरू डॉ.मनोहर चासकर

*
नांदेड:( दि.२३ जुलै २०२४)
विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी प्राध्यापकांनी प्रयत्नरत रहावे. शिक्षण आणि सिंचन ही दोन्ही क्षेत्रे महत्त्वपूर्ण असून ज्ञान संपादनाच्या निष्कर्षाविषयी जनजागृती करावी. नाविन्यपूर्ण ज्ञान आणि रोजगाराविषयी समग्र चर्चा करावी. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. समाजाची गरज काय आहे, विशेषतः मराठवाड्याची काय गरज आहे, याविषयी संशोधन केंद्रांनी आत्मपरीक्षण करून त्या संदर्भातील संशोधन विषय पीएच.डी. साठी द्यावेत. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, गुणवत्ता व संशोधनाकरिता विद्यापीठे आणि शिक्षण संस्था अहोरात्र प्रयत्न करीत असतात, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष, यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३ जुलै रोजी आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रम आणि श्रेयांक संरचना’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटकीय समारोहात ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर कार्यशाळेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी शिक्षण राज्यमंत्री व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री.डी.पी. सावंत, व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. नरेंद्र चव्हाण, संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.डी.एन. मोरे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ.एम.के.पाटील, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. पराग खेडके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.दिगंबर नेटके आणि विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात महाराष्ट्राचे माजी शिक्षण राज्यमंत्री व संस्थेचे सचिव श्री.डी.पी सावंत म्हणाले की,कृषी, उद्योग, सेवा, शिक्षण आदी सर्व क्षेत्रातील लोकांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडून अपेक्षा आहेत. शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदू विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा अथांग सागर पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहावा, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ध्येय आहे.
विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आणि संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री.नरेंद्र चव्हाण यांनी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने तरुणांना नोकरीच्या संधी मिळतील. अद्ययावत आकडेवारीनुसार कृषीक्षेत्राच्या विकासाचा आलेख खाली आला आहे. कृषी हे सर्वात दुर्लक्षित क्षेत्र बनत आहे; ही भविष्यातील फार मोठी धोक्याची घंटा असून विद्यार्थ्यांना त्या संदर्भातील शिक्षण दिले पाहिजे, असे आवाहन केले.
प्रारंभी प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, जबाबदार आणि गुणवत्तापूर्ण नागरिक घडविण्याची जबाबदारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आहे. सध्याचे जग ‘नॉलेज इकॉनॉमी’चे असून पात्र आणि जबाबदार विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने सकारात्मकरित्या प्रयत्न करणे अपेक्षित आहे. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनलेली आहे. ‘नोकरी देण्याची’ संकल्पना रुजविण्याची हीच उत्तम वेळ आहे.
उद्घाटकीय सत्राचे उत्कृष्ट काव्यात्मक सूत्रसंचालन मराठीचे साहित्यिक डॉ.विश्वाधार देशमुख यांनी केले आणि आभार डॉ.नीरज पांडे यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात ‘अभ्यासक्रम आणि श्रेयांका’ विषयी विस्तृत विवेचन बीजभाषक डॉ.डी.एन.मोरे यांनी केले. तसेच ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर डॉ.एम.के. पाटील यांनी व्याख्यान दिले.
या सत्राचे सूत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमारानी राव आणि डॉ. साहेब शिंदे यांनी केले. आभार डॉ. कैलास इंगोले यांनी मानले.
शेवटच्या प्रश्नोत्तर सत्रात डॉ. एम. ए.बशीर, डॉ.नीरज पांडे, डॉ.दत्ता मेहत्रे, मुदखेड, डॉ.विजय भोसले, डॉ. साहेब शिंदे, डॉ.संदीप पाईकराव, डॉ.अजय मुठे, डॉ. शिवराज शिरसाठ, डॉ.बतुल्ला बालाजीराव, आदींच्या प्रश्नांना तज्ञांनी समर्पक उत्तरे दिली.
संपूर्ण कार्यशाळेचे आभार उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांनी मानले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ. संजय ननवरे, डॉ.मोहम्मद आमेर, डॉ. बतुल्ला बालाजीराव, डॉ.धनराज भुरे, डॉ. रमेश चिल्लावार, डॉ.मदन अंभोरे, प्रा.माधव दुधाटे, डॉ.ए.एस.कुवर, डॉ. एम. एम. व्ही. बेग, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.अजय मुठे, डॉ.नीरज पांडे, डॉ.संदीप पाईकराव, डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.राजरत्न सोनटक्के, डॉ.सुभाष जुन्ने, डॉ.साहेब शिंदे, डॉ.प्रवीण तामसेकर, डॉ.कैलास इंगोले, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ.दिगंबर भोसले, प्रा. भारती सुवर्णकार, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, राजेश अडबलवार, माधव डाकोरे, परशुराम जाधव, जगदीश उमरीकर, बळवंत शिंदे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.
कार्यशाळेस नांदेड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे समन्वयक आणि प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.