ताज्या घडामोडी

यशवंत महाविद्यालयात प्राध्यापकांचे कार्य आणि कर्तव्य या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

नांदेड: (दिनांक 28 सप्टेंबर) श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या यशवंत महाविद्यालयात दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी एक दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. “उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांची कार्य व कर्तव्य” या विषयावर आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) ने केले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी उद्घाटनपर मुख्य भाषण केले. प्रमुख वक्ते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे निवृत्त भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रमाकांत कपले यांनी सहभाग घेतला. डॉ. कापले यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांच्या कार्य, कर्तव्य व भूमिकेबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.
डॉ. शिंदे यांनी शिक्षकांना केवळ ज्ञान देणारे नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक असल्याचे सांगितले. तसेच, शिक्षणात नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्याने व्यावसायिक विकासाची गरज त्यांनी अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपप्राचार्य डॉ. हरीशचंद्र पतंगे यांनी आभार प्रदर्शन केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.