ताज्या घडामोडी

मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी आत्मविश्वास आणि मेहनत गरजेची असते: डॉ. दीपक वाघमारे

नांदेड प्रतिनिधी: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
महाविद्यालयीन विद्यार्थी व अभ्यासाचं नातं अतूट असतं आपण नेहमी मोठी स्वप्न बघितली पाहिजेत परंतु बघितलेली मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीची गरज असते. असे प्रतिपादन प्रतिभा निकेतन महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दिलीप वाघमारे यांनी केले आहे. यशवंत महाविद्यालय ,नांदेड येथील लोकप्रशासन विभागाने आयोजित केलेल्या अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप प्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे मॅडम हे होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.मिरा फड यांनी केले .यशवंत महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागात लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी लोकप्रशासन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. मीरा फड यांनी प्रस्तावित केले प्रस्ताविकामध्ये प्रतिपादन केले की अभ्यास मंडळांतर्गत भित्तिपत्रक पोस्टर प्रेसेंटेशन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास व विषयाशी संबंधित गेस्ट लेक्चर आयोजित केले जातात. प्रमुख पाहुणे व उद्घाटक डॉ. दीपक वाघमारे यांचे स्वागत उप प्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे मॅडम यांनी शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन केले. यावेळी लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे उद्घाटन झाल्याचे प्रमुख पाहुण्याने घोषित केले. अभ्यास मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .प्रमुख पाहुणे पुढे बोलताना म्हणाले की ,स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी हे एक शास्त्र आहे .सर्वात प्रथम ध्येय निश्चित करणे आणि नंतर ध्येयाला अनुसरून कृती करणे हे त्याचा एक भाग आहे. प्रशासनात अधिकारी होण्यासाठी पात्रता ,कार्यक्षमता व गुणवत्ता ही त्रिसूत्री महत्त्वाची असते .हीच आपल्या यशाची खरी गुरुकिल्ली असते. प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक वाघमारे यांनी प्रशासनामध्ये यशस्वी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनकथा विद्यार्थ्यासमोर अतिशय प्रभावीपणे उलगडून दाखवल्या आपल्या उद्बोधन पर भाषणामध्ये डॉक्टर दीपक वाघमारे यांनी अनेक वेळा विद्यार्थ्यांना भावुक बनवून त्यांच्या मनातील परीक्षेच्या संदर्भातली भीती अगदी अलगद व सहजपणे दूर केली.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांनी पालकाच्या व गुरुजनाच्या परिश्रमाची जाणीव ठेवून आचरण केलं पाहिजे तसेच प्रशासकांन आपल्या अंगी असलेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देशाच्या संविधानाला अपेक्षित असणारी व्यवस्था टिकवून प्रशासन संविधानवादी बनवलं पाहिजे .असे परखड मत व्यक्त केले .शेवटी डॉ.आर. पी .गावंडे यांनी उपस्थितांचे आभार मानून महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.