ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मधील विद्यार्थ्यांची संशोधनांतर्गत इंटर्नशिपसाठी निवड

नांदेड:( दि.१५ ऑक्टोबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील साक्षी मात्रे, शीतल जाधव, राधिका माने, सुप्रिया उमाटे, नेहा उमाटे, शशांक गाडेकर, वैष्णवी सेवनकर, शिवानी सपुरे, शीतल आढाव या नऊ विद्यार्थ्यांची ग्राउंड झिरो संशोधन इंटर्नशिपअंतर्गत १२ हजार रुपये मानधनावर निवड करण्यात आली आहे.
इंटर्नशिपअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड करणारे यशवंत महाविद्यालय हे संशोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम व विद्यार्थ्यांना रोजगार देण्याच्या दिशेने पाऊल उचलणारे अग्रणी महाविद्यालय आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दररोज किमान सहा तास प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रासह यथोचित सन्मान महाविद्यालयातर्फे केला जाणार आहे. सर्व विद्यार्थी हे बी.ए., बी.कॉम. व बी.एससी. शिक्षणप्रक्रियेतील असून हे प्रशिक्षण भविष्यात रोजगार प्राप्तीच्या ध्येयासाठी निश्चितच उपयुक्त असेल; असा आत्मविश्वास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
विद्यार्थ्यांना निवडपत्र प्रदान करून शुभेच्छा व सत्कार सोहळा प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, इंटर्नशिप कमिटीचे समन्वयक डॉ. विजय भोसले, सदस्य उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.संदीप खानसोळे, डॉ. श्रीकांत जाधव, डॉ.अजय मुठे, प्लेसमेंट गायडन्स सेलचे समन्वयक डॉ.मदन अंभोरे, डॉ. एन.बी.चव्हाण, डॉ.ए.एस.कुवर, डॉ. मोहम्मद आमेर, डॉ.नारायण गव्हाणे, डॉ.वाय.टी.नकाते, डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ.रत्नमाला म्हस्के यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि यशस्वीतांचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल. व्ही. पदमारानी राव, डॉ.शिवदास शिंदे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.