ताज्या घडामोडी

आधार नोंदणीसाठी सुधारित दर निश्चित* *जास्तीचे दर आकारणी केल्यास तक्रार नोंदवावी

नांदेड दि. 6 नोव्हेंबर :- भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण दिल्ली यांच्याकडील कार्यालयीन ज्ञापन 19 सप्टेंबर 2025 नुसार आधार नोंदणी व आधार अपडेट तसेच अनिवार्य आधार अपडेट सेवांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार पुढीलप्रमाणे सुधारित दर निश्चित केले आहेत. या निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त जास्तीचे दर आकारणी करणाऱ्या आधार केंद्र चालकाविरुद्ध नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डीआयटी कक्षात अथवा संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
*अद्यावतीकरणाचा प्रकार व शुल्क*
* नवीन आधार नोंदणी- निशुल्क
* बालआधार 5 वर्षानंतर अद्यावत करणे अनिवार्य (बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ, हाताचे ठसे करणे)- निशुल्क
* नागरीकांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे 5 ते 7 व 15 ते 17 वयोगटासाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे इत्यादी)- निशुल्क
* नागरीकांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे 15 ते 17 वयोगटासाठी (अनिवार्य) बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे इत्यादी) 7 ते 15 वयोगटासाठी 1 जानेवारी 2025 ते पुढील एक वर्षाकरीता- निशुल्क
* नागरिकांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे 17 वर्षावरील बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे इत्यादी)- रुपये 125 (जीएसटीसह).
* सर्व सामान्य नागरीकांचे आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे, डेमोग्राफिक अद्यावतीकरणासह)- रुपये 125 (जीएसटीसह).
* सर्वसामान्य नागरिकांचे आधारमध्ये एकापेक्षा जास्त डेमोग्राफिक अद्यावतीकरण (नाव, पत्ता, मोबाईल, लिंग, इत्यादी अद्यावतीकरण करणे)- रुपये 75 (जीएसटीसह).
* सर्वसामान्य नागरिकांचे Proof of Address (POA) / Proof of Identity (Pol) दस्तेवज अद्यावतीकरण करणे)- रुपये 75 (जीएसटीसह).
* SSUP (my Aadhaar) पोर्टलद्वारे Proof of Address (POA)/Proof of Identity (Pol) द्वारे अद्यावतीकरण करणे- रुपये 75 (जीएसटीसह).
* ई-आधार डाऊनलोड करून कलर प्रिंट देणे- रुपये 40 (जीएसटीसह).
* आधार नोंदणी व अद्यावतीकरण करण्याकामी Home Enrolment करणे- रुपये 700 (जीएसटीसह) असे शुल्क आकारले जातील.

या दराप्रमाणे आधार केंद्रचालकांनी नागरिकांकडून आधार नोंदणी व अद्यावतीकरण करण्यासाठी सेवा शुल्काची आकारणी करावी. नागरिकांनी निश्चित केलेल्या या दराव्यतिरिक्त जास्तीची आकारणी करणाऱ्या आधार केंद्र चालकाविरुद्ध नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय डी.आय.टी.कक्ष दुसरा माळा तसेच संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी. तसेच भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण यांचा टोल फ्री क्रमांक 1947 या क्रमांकावर सुद्धा नागरीक तक्रार नोंदवू शकतात. नागरिकांनी Physical Aadhaar चा वापर न करता Mask Aadhaar चा वापर करावा जेणेकरून आधार नंबरचा गैरवापर टाळता येऊ शकेल, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतु समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी केले आहे.
00000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.