बोगस दिव्यांग शिक्षकांची पोलखोल करून दैनिक’लोकपत्रच्या डॉ.गणेश जोशींनी घडवला इतिहास..

नांदेड:
मे-जून महिन्यामध्ये राज्यात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेमधील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या सुरू केल्या.यामध्ये दिव्यांग बांधवांना सोयीस्कर व्हावे या उद्देशासाठी बदलीमध्ये नजीकच्या शाळा मिळण्यासाठी सवलत देण्यात आली होती.खऱ्या दिव्यांगांना अशी सवलत मिळणे नैसर्गिक न्याय सुद्धा आहे.याच दरम्यान नांदेड जिल्हापरिषदेमध्ये जवळपास 750 दिव्यांग शिक्षक बांधवांनी बदलीसाठी सवलतींचा लाभ घेतल्याचे दिसून आले.विविध व्यक्ती,सामाजिक संघटनांनी दिव्यांग शिक्षकांच्या प्रमानाबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या होत्या.परंतु भ्रष्ट प्रशासन पांघरून घालत होते.याच कालावधीत दैनिक लोकपत्र समूहाचे पत्रकार डॉ.गणेश जोशी साहेबांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लेखणी उचलली,आणि श्रीगणेशा केला.यामध्ये डॉ.जोशी साहेबांनी पहिल्या दिवसापासूनच अभ्यासू,शोध पत्रकारितेतून बारकाईने सर्व माहिती जमावण्यास सुरुवात केली,त्यात बोगस दिव्यांग म्हणजे काय…? ते प्रमानपत्र कसे काढतात…? वैद्यकिय अधिकारी प्रमाणपत्र कसे वितरित करतात…? बनावट प्रमाणपत्र कोणते….? बोगस दिव्यांग प्रमाणपत्र कसे काढतात….? यासाठी कोणती टोळी आहे….? बोगस दिव्यांग प्रमानपत्र विकणाऱ्या टोळीचा म्होरक्या,आणि मुख्यालय….? बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठीचा खर्च…?
या सर्व बाबींचा अभ्यास करून सप्टेंबर महिन्यापासून पोलखोल चव्हाट्यावर आणली.दरम्यानच्या कालावधीत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी नांदेड यांच्या सप्रमाण चर्चा करून खऱ्या दिव्यांगांना न्याय देण्यासाठी विनंती केली.परंतु प्रशासन कासवगतीने वाटचाल करू लागले.दरम्यानच्या कालावधीत कर्तव्य दक्ष CEO मेघना कावली मॅडम यांनी बोगस दिव्यांगांचा शोध घेण्यासाठी पडताळणी,फेरतपासणी मोहीम राबवली.आणि वास्तव शोधण्याचा प्रयत्न केला.नांदेड जिल्ह्यातील पत्रकारितेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल की,एखाद्या सामाजिक मुद्द्यावरती सलग 50 दिवस लेखमालिका सुरू होती.साधारणतः 250 बोगस दिव्यांग बांधवांनी जिल्हा परिषदेला 200 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे लोकपत्र ने समाजासमोर आणले.याच दरम्यान काही असामाजिक तत्त्वांनी हा आवाज दाबण्यासाठी या अभ्यासू पत्रकारांना लाखो रूपयांचा नजराणा देण्याचा प्रयत्न केला.त्यानंतरही डॉ.जोशी यांची लेखणी थांबली नाही.कोणत्याही दबावाला ते जुमानले नाहीत.तथाकथित काही राजकारण्यांनी धमकी दिली,तरीही ते वाकले नाहीत.प्रसंगी अधिक जोमाने त्यांनी स्वतःला कामात झोकून दिले.आदर्श पत्रकार कसा असावा याचे उकृष्ट मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ.गणेश जीशी सर.
डॉ.गणेश जोशी साहेबांचा प्रवास नांदेड जिल्ह्याबरोबर संबंध महाराष्ट्र सुद्धा पाहत आहे.किंबहुना राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे,एकनाथ डवले साहेब सुद्धा या बोगस दिव्यांग मालिकेचा बारकाईने अभ्यास करत आहेत.दोन महिन्यांपूर्वी एकही बोगस कर्मचारी नाही असे म्हणणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला चपराक बसली आहे.197 बोगस दिव्यांग शिक्षकांवर कार्यवाही करण्याबत आरोग्य उपसंचालक लातूर,आणि मुंबई यांच्याकडे अहवाल पाठवला आहे,यावर उपसंचालक कार्यालयातून चेंडू मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याच कोर्टात परत पाठवला.एका अभ्यासू पत्रकारांच्या लेखणीच्या ताकतीने ही कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जागी केले,आणि सामाजिक दायित्वाची दिशा दिली.आता प्रतीक्षा आहे ती या बोगस 200 दिव्यांगांना मुख्य कार्यकारी अधिकारी कशाप्रकारे शासन करणार ते पाहण्याची….?
दैनिक लोकपत्र समूहाने हा खऱ्या दिव्यांगावरील सामाजिक अन्याय लेखणीच्या माध्यमातून पटलावर आणला त्यासाठी अर्धशतकापर्यंत सलग लिखाण केले त्याबद्दल अभिनंदन…..!
*—-गोविंद पाटील सोळंके*
*प्रदेशाध्यक्ष,शिवराज्य शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य.*
मो-9604325349
7588068535



