स्वारातीम’ विद्यापीठात एकता दिनानिमित्त कुलगुरूंनी दिली शपथ

नांदेड:(प्रविणकुमार सेलुकर) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे इंदिरा गांधी पुण्यतिथी आणि भारताचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दिनाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर प्र कुलगुरू अशोक महाजन यांच्या हस्ते इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर राष्ट्रीय संकल्प दिन व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त कुलगुरू डॉ. चासकर यांनी उपस्थित अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली. देशाच्या अखंडतेस, ऐक्याला आणि बंधुभावाला बळकटी देण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
कार्यक्रमाला प्र कुलसचिव तथा अधिष्ठाता डॉ एम के पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ प्रशांत पेशकार, परीक्षा संचालक हुशारसिंग साबळे, इंनोवेशन संचालक शैलेश वाढेर, एनएसएस संचालक डॉ मारुती गायकवाड, उपकुलसचिव रवी सरोदे, सहाय्यक कुलसचिव रामदास पेद्देवाड, टी सी भुरके, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, आधीसभा सदस्य शिवाजी चांदणे, लक्ष्मीकांत आगलावे, संदीप एडके, संतोष हंबर्डे तसेच शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



