नांदेडचे. खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन
नांदेड प्रतिनिधी
काँग्रेसचे नांदेडचे ज्येष्ठ खासदार वसंतराव चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होती त्यामुळे त्यांना हैदराबामधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आले होते .
. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडलीत्यानंतर पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तसंच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.