ताज्या घडामोडी

मानवतला युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण *मानवत तालूका पत्रकार संघ गणेश मंडळाचा उपक्रम

मानवत / प्रतिनिधी

युवती व महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर *मराठी पत्रकार परिषद , मुंबई संलग्न* मानवत तालुका पत्रकार संघ गणेश मंडळाच्या वतीने शुक्रवारी दिनांक १३ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
शहरातील नेताजी सुभाष विद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे व त्यांच्या सहकारी युवती शालेय विद्यार्थिनी , युवती व महिलांना *स्वसंरक्षणाचे* धडे देणार आहेत . या कार्यक्रमास शहरातील सर्व माध्यमिक , उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन युवतीसह शहरातील महिला मंडळाच्या महिला उपस्थित राहणार आहेत . कार्यक्रमास सर्व युवती व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राणा संजय नाईक , सचिव प्रा. प्रसाद जोशी , प्रा. मोहन बारहाते , गोपाळ लाड , श्याम झाडगावकर , डॉ सचिन चिद्रवार , सचिन मगर , दिगंबर बाकळे , पांडुरंग जाधव , दशरथ शिंदे , रामेश्वर काष्टे , ऍड मुकुंद पाटील , आश्रोबा केदारे , अनिल चव्हाण , प्रवीण घागरे , राम दहे आदींनी केले आहे .

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.