ताज्या घडामोडी

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या छात्र सैनिकांचे एन.सी.सी परीक्षेत यश

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात एन.सी.सी. 'बी' प्रमाणपत्र व 'सी' प्रमाणपत्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव).

नांदेड:
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात छात्र सैनिकांच्या एन.सी.सी. परीक्षेतील यशाबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. महेंद्र कुमार कुलकर्णी व प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.अर्चना भवानकर हे उपस्थित होते. तसेच शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. डॉ. पंकज यादव यांची उपस्थित होती. एन.सी.सी. ‘सी’ प्रमाणपत्र साठी महाविद्यालयातील दहा (१०) विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून होते. हे सर्वच विद्यार्थी ‘सी’ प्रमाणपत्र विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले. तसेच ‘बी’ प्रमाणपत्रासाठी महाविद्यालयातील एकूण एकवीस (२१) विद्यार्थी परीक्षार्थी होते हे सर्व विद्यार्थी देखील विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ‘सी’ प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी सीनियर अंडर ऑफिसर नारायण खंदारे, स्वप्निल लुटे, कांगुलकर मारुती , राठोड निलेश, तोडे गुरुनाथ स्वराज बोरगावे इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश होता. एन.सी.सी. प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. महेंद्र कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना एन.सी.सी. च्या बी आणि सी प्रमाणपत्रा सोबतच स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साध्य केला आहे. तसेच या प्रमाणपत्राचा उपयोग करून आपण भारतीय सेनेमध्ये अधिकारी व सैनिक म्हणून रुजू होण्याचे प्रयत्न करावेत व देश सेवेसाठी समर्पित व्हावे असे आवाहन केले. तसेच या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अर्चना भवानकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक एकात्मता अधिक घट्ट करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन संख्याशास्त्र विभाग प्रमुख तथा एन.सी.सी. अधिकारी लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. पंकज यादव यांनी मानले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे, संस्थेचे कोषाध्यक्ष मा. कैलासचंजी काला व संस्थेच्या सचिवा मा. ॲड. वनिताताई जोशी यांनी अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.सी.सी. कॅडेट रंजना यादव,प्रिया सातलवाड, पुनम ठाकूर, रसिका महाजन, अमृता दुबे, वैष्णवी डांगे व इतर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.