डेटा ॲनालिसिस क्षेत्रात नोकरीच्या अमाप संधी -प्रा. धनंजय चन्नाळे

नांदेड: प्रतिनिधी
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग आणि संशोधन केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “डेटा ॲनालिसिस : थिअरी अँड प्रॅक्टिस” या ऍडऑन कोर्स च्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कोर्सचे उद्घाटन करण्यासाठी प्रा. धनंजय चन्नाळे, गुरुनानक देव कॉलेज, सायन, मुंबई हे उद्घाटक म्हणून उपस्थि होते. सदरील ऍडऑन कोर्सच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करत असताना प्रा. धनंजय चन्नाळे असे म्हणाले की,आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेटा हे निर्णय घेण्याचे प्रमुख साधन बनले आहे. त्यामुळे डेटा ॲनालिसिस हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे यात शंका नाही. आज जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये जसे कि विविध उद्योग-व्यवसाय, बँकिंग, शिक्षण, आरोग्य, शासन, संशोधन इ. डेटा ॲनालिसिस ची मोठी मागणी होत आहे. हा अतिशय महत्वाचा कोर्स उपलब्ध करून दिल्या बद्धल खरोखरच अर्थशास्त्र विभागाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. असा कोर्स पूर्ण केल्यास नोकरीची अमाप संधी अनेक क्षेत्रात उपलब्ध आहेत. कारण डेटा ॲनालिसिस च्या साह्याने मोठ्या प्रमाणातील आकडेवारीचे विश्लेषण करून त्यातून योग्य ते ट्रेंड्स, पॅटर्न आणि निष्कर्ष काढता येतात. यामुळे निर्णय हे शास्त्रीय पद्धतीने घेता येतात. म्हणून हा कोर्स करून विध्यार्थांनी या क्षेत्रातील अनेक नोकरीच्या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घायला हवा असे ते म्हणाले. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी असे प्रतिपादन केले की, अर्थशास्त्र हा जागतिक महत्व असलेला आणि शास्त्रीय अधिष्ठान असलेला अत्यंत उपयुक्त विषय आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर देशाची आणि समाजाची प्रगती अवलंबून असते. म्हणूनच अभ्यासकांनी आणि संसोधकांनी डेटा ॲनालिसिस हा विषय समजून घेऊन. त्याच्या सोबतीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पायथॉन, आर प्रोग्रामिंग, एस.पी.एस. एस.सॉफ्टवेअर , एक्सेल या सांख्यिकीय साधनांचा पर्याप्त वापर कसा करता येईल हे पाहावे असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अजय मुठ्ठे यांनी मांडले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात “डेटा ॲनालिसिस : थिअरी अँड प्रॅक्टिस” हा कोर्स विद्यार्थ्यांना करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध करून देणारा आहे. कारण डेटा ॲनालिसिस कोर्समुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, विश्लेषणात्मक विचारशक्ती, तांत्रिक कौशल्ये व योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे हा कोर्स आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा ठरणार असेही ते म्हणाले. त्यामुळे अशा व्यवहारिक उपयोगाचा कोर्स अर्थशास्त्र विभागाच्या वतीने सुरु केला जात असल्याचे डॉ. मुठ्ठे यांनी स्पष्ट केले. तरी सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या कोर्सला ऍडमिशन घेऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या असंख्य विध्यार्थ्यांसह अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. डी. डी. भोसले, डॉ.डी.ए. पुपलवाड, प्रा. राहुल लिंगमपल्ले, डॉ. शिवराज आवाळे, डॉ संतोष पाटील, प्रा. देशमुख मॅडम, डॉ. प्रवीण सेलुकर हे ही उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी.डी. भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. डी.ए. पुपलवाड यांनी मांडले.