ताज्या घडामोडी

यशवंत महाविद्यालय येथे रोजगार मेळावा आयोजन

नांदेड दि. २७ फेब्रुवारी :- मिळेल ती नोकरी घेऊन सुरुवात करा. एक छोटीशी सुरुवात आपलं करिअर घडू शकते, या संदेशासह जिल्ह्यातील तमाम बेरोजगारांना कौशल्य विकास विभागाने शुक्रवारी होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी आमंत्रित केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वा. यशवंत महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक व इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वा. यशवंत महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

00000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.