यशवंत ‘ मध्ये श्रद्धेय कै.डॉ. शंकररावजी चव्हाण यांना विनम्र अभिवादन

नांदेड:( दि.२६ फेब्रुवारी २०२५)
भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन आणि विनम्र अभिवादन केले तसेच उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, अधीक्षक गजानन पाटील, डॉ.श्रीरंग बोडके, डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ.संतोष मोरे, डॉ.शिवदास शिंदे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. शिवराज बोकडे, डॉ.संजय जगताप, डॉ. संदीप पाईकराव, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.एम.ए.बशीर, डॉ.संजय ननवरे, डॉ.भरत कांबळे, डॉ.मीरा फड, डॉ.बी.बालाजीराव आदी विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विनम्र अभिवादन केले.