प्रतिभा निकेतन महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिना”निमित्त संगत पुस्तकाची उपक्रमात सुरुवात

*नांदेड (२७):* प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेडमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर गंगाखेडकर यांच्या प्रेरणेतून ‘संगत पुस्तकां’ची हा उपक्रम साजरा करण्यात आला करण्यात येत आहे.
याविषयी प्रास्ताविक करताना कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्राचार्य डॉ. गंगाखेडकर यांनी महाविद्यालयातील सर्व सहकारी आणि विद्यार्थ्यांना आज दिनांक २७ फेब्रुवारी पासून पुढील दहा दिवस आपण सर्वजण पुस्तकांच्या सहवासात राहूया,असे नम्र आवाहन केले. आज कमी होत चाललेले वाचन आणि मोबाईलचा वाढलेला स्क्रीन टाईम कमी व्हावा यासाठी हा उपक्रम आपण राबवित असल्याचे सांगितले. आज पासून पुढील दहा दिवस एक पुस्तक सोबत बाळगून पुस्तकाशी सहवास वाढवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी या उपक्रमास जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन आपले मित्र, स्नेही यांनीही या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाचा समारोप करताना मराठी भाषा व साहित्य संशोधन केंद्राचे विभागप्रमुख प्रा. डॉ.संजय हापगुंडे यांनी वाचन प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी लौकिक आणि पारलौकिक जीवनातील प्रेमाचे दाखले देऊन वाचन प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. याप्रसंगी ग्रंथपाल रवींद्र लाठकर, डॉ.श्रीमंत राऊत,डॉ. मारोती लुटे, डॉ.राहूल वरवंटीकर , डॉ. ममता मालवीया, प्रा. डॉ.डी. एस. वाघमारे, डॉ.जी.टी.वाघमारे, डॉ.जीवन चव्हाण, डॉ.बाबू गिरी, डॉ.चंद्रकांत गजभारे,प्रा.व्ही.डी.जाधव,प्रा.प्रवीण स्वामी, प्रा.सपना पाटील याबरोबरच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.