मनाची स्थिरता भगवंताच्या चिंतना शिवाय होत नाही… महामंडलेश्वर मनिषानंदजी पूरी.

मानवत / प्रतिनिधी.
———————————————
मन हे फार चंचल आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी त्यांच्या चिंतनासाठी मनाला स्थिर ठेवणे महत्त्वाचे आहे.
यासाठी भगवंताचे चिंतन महत्वाचे आहे. असे विचार ह.भ.प. महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांनी येथील जुन्या दत्त मंदिर मध्ये परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्या *111 व्या* पुण्यतिथी निमित्त दरम्यान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता.
या अखंड हरिनाम सप्ताह समापन दिनी. तसेच परमपूज्य श्री गोविंदगिरीजी महाराज यांच्या महर्षी वेद प्रतिष्ठानच्या वतीने येथील जुन्या दत्त मंदिर मध्ये प.प.स्वामी योगानंद सरस्वती महाराज वेद विद्यालयाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी महर्षी वेद प्रतिष्ठानचे विश्वस्त आळंदी येथील परमपूज्य नंदे महाराज. आ. राजेश विटेकर, डॉ. अंकुशराव लाड. सेलू येथील उद्योगपती बियाणी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या शुभ प्रसंगी ह.भ.प. महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाले. वेद माहुली ही आधी काळापासून आहे गुरुमाऊलीनी वेदाची रचना केली. पालन पोषण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाचेही पालन पोषण होणे गरजेचे आहे. श्रुती वेदमाऊली पालन पोषण करणारी गुरुमाऊली. स्वतःच्या जीवनाबरोबर साऱ्या विश्वाचे पालन पोषण होणे महत्त्वाचे आहे. हित म्हणजे पालन पोषणाचे अनुभव. मन हे पाण्यासारखे चंचल आहे मनाला स्थिर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मनाची स्थिरता ही भगवंताच्या नामस्मरणा शिवाय होत नाही. संसार हे चंचल असून गतिशील आहे. संसारावर व गतीवर नियंत्रण असणे जरुरी आहे. यांचे मन गतिशील आहे.त्यांना शांती मिळणे शक्य नाही. मनाला शांती मिळणे जरुरी आहे. या जगाच्या पाठीवर फक्त देव हे स्थिर आहे. आपले मन स्थिर नाही. वेड माऊली भगवंतांची ओळख करून देते. त्यांच्या प्राप्तीसाठी वेद माऊली हि मार्ग दाखवते. ब्राह्मणांना वेदाचे अध्ययन अभ्यास असणे अत्यंत जरुरी आहे. पूर्ण श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. केवळ श्रद्धा असून चालत नाही तर मनाचे शुद्धीकरण होणेही महत्त्वाचे आहे. हे ब्रह्म करमात सांगितलेले आहे. प.प.स्वामी योगानंद सरस्वती स्वामी महाराज वेध विद्यालयाचे शुभारंभ महर्षी वेद प्रतिष्ठानचे संस्थापक व आयोध्या मंदिर चे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंददेव गिरी जी महाराज यांनी ऑनलाइन द्वारे मार्गदर्शन करून उद्घाटन केले. या शुभप्रसंगी स्वामी योगानंद सरस्वती महाराज यांच्या प्रतिमेला आ. राजेश विटेकर महर्षी वेद प्रतिष्ठानचे विश्वस्त नंदे गुरुजी. डॉ.अंकुश लाड. सेलू येथील उद्योगपती बियाणी यांच्या हस्ते पुष्प माला अर्पित करण्यात आली.
सध्या मानवत येथे शुभारंभ झालेल्या वेदपाठ शाळेमध्ये चार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून या विद्यालयात आठ विद्यार्थ्यांची मर्यादित संख्या आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख एडवोकेट अनिरुद्ध पांडे यांनी केले.
***