ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद फार्मसी महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

————————————
उदगीर:- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद फार्मसी महाविद्यालयाचा एमएसबीटीई मुंबई मार्फत उन्हाळी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या डी.फार्मसी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी घव-घवीत यश संपादित करीत महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
सदरील परीक्षेत डी. फार्मसी द्वितीय वर्षातील म्हेत्रे गणेश- 79.36 %,सोळुंके अश्विनी-74.91 %,नखाते अमृता- 74.82% तर प्रथम वर्षातील महानुरे कांचन -78.30 %,बिचिपले प्रतिभा-74.40%, तोंडारे श्रध्दा -68.60% गुण संपादित करीत विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले तर इतर विद्यार्थी प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप, संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश तोलसरवाड, प्रा. अहंकारी श्रीपाद, प्रा. मुक्ता महेश, प्रा. पांडे ज्योती, प्रा. शिंदे साधना, प्रा. पठाण निलोफर, प्रा. लांजिले प्रवीण, संदेश गवळे, वैभव बिडवे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.