ताज्या घडामोडी

१५ सप्टेंबर रोजी शिर्डी येथील ‘पेन्शन राज्य अधिवेशनात प्राध्यापकांनी सहभागी व्हावे !

नांदेड:

महाराष्ट्रातील सर्व कर्मचार्‍यांना ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करावी या मागणीसाठी ‘महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना’ व कर्मचारी समन्वय समितीने दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी शिर्डी, जि. अहमदनगर येथे ‘पेन्शन राज्य अधिवेशन’ आयोजित केले आहे.
महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना डीसीपीएस/एनपीएस योजना’ सुरू केली. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारने २४ व २५ सप्टेंबर २०२४ रोजी अनुक्रमे ‘एकीकृत निवृत्तीवेतन योजना’ (U.P.S.) व ‘सुधारित पेन्शन योजना’ लागू करण्याची घोषणा केली आहे. या सर्व पेन्शन योजनांचे स्वरूप बघता या योजना निव्वळ फसव्या असून त्यातून सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांना सामाजिक व आर्थिक स्थैर्य मिळणे कठीण आहे.
त्यामुळे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना म.ना.से. अधि. १९८२ व १९८४ अंतर्गत जुनीच पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी अशी मागणी राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांच्या वतीने सातत्याने विविध आंदोलने, मोर्चे, उपोषणे आदि माध्यमातून केली जात आहे.
नवीन पेन्शन योजनेतील राज्यातील जवळपास ८ लाख २७ हजार कर्मचाऱ्यांचा सुधारित पेन्शन योजनांना विरोध असून केवळ जुनी पेन्शन योजनाच कर्मचाऱ्यांच्या हिताची आहे हे राज्य शासनाला ठणकावून सांगण्यासाठी दि १५ सप्टेंबर २०२४ रोजी संत जनार्दन स्वामी आश्रम शेजारी, शिर्डी जि. अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या पुढाकारातून पेन्शन महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
राज्य पातळीवर महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुक्टो) व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत ‘एमफुक्टो’ संलग्नित ‘स्वामुक्टा’ प्राध्यापक संघटनेच्या वतीने या राज्यस्तरीय पेन्शन अधिवेशनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. ‘स्वामुक्टा’चे सर्व पदाधिकारी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने या पेन्शन अधिवेशनात सक्रीयपणे सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुर्यकांत जोगदंड, सचिव डॉ. विजय भोपाळे, कोषाध्यक्ष डॉ. दिलीप पाईकराव, उपाध्यक्ष डॉ. डी. एन. मोरे, समन्वयक डॉ.अमोल लाटे व केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी डॉ. गोपाळ मोघे, डॉ. टी.आर.फिसफिसे, डॉ. सुनील व्हावारे, डॉ. करुणा देशमुख, प्रा. डी.आर.भुरे, डॉ. गौतम दुथडे, डॉ. सुधीर वाघ, डॉ. किशोर हुगे, डॉ.जयद्रथ जाधव, डॉ. रामचंद्र भिसे, डॉ. नानासाहेब पाटील, डॉ. काशिनाथ चव्हाण, डॉ. प्रभाकर जाधव,डॉ.संजीव अग्रवाल, डॉ. मनोजकुमार सोमवंशी, डॉ. रावसाहेब इंगळे, डॉ. बाळासाहेब गित्ते, डॉ. एस.आर. यादव यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.