इक ओंकार सतनाम: श्री गुरुनानक देवजींचा मधुर मार्ग (संकलन आणि शब्दांकन:डॉ.अजय गव्हाणे)

श्री गुरुनानक देवजी यांनी परमात्म्यास गीत गाऊन प्राप्त केले. गीतांनी समृद्ध असलेला मार्ग श्री गुरुनानक देवजी यांचा आहे. यामुळे श्री गुरुनानक देवजी यांचा शोध आणि निर्मिती एकदम विभिन्न आहे.
श्री गुरुनानक देवजी यांनी पूर्ण प्राण पणाला लावून गीत गायले. त्यांचे गीत असे होते की, गीत हेच ध्यान झाले. गीत हेच योग बनले. गीत हेच तप बनले. परमात्माच्या मार्गावर श्री गुरुनानक देवजी यांच्यासाठी गीत आणि फुल अंथरलेले आहेत. यासाठीच त्यांनी जे काही सांगितले गीत गाऊन सांगितले. अत्यंत मधुर आहे त्यांचा मार्ग….. रसयुक्त.
श्री गुरुनानक देवजी तेच आहेत; ज्यांनी मधास बिना मोजता प्राशन केले; मग आयुष्यभर गीत गात राहिले. हे गीत साधारण गायकाचे नाहीत. हे गीत त्यांचे आहे…. ज्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त केले आहे. या गीतांमध्ये सत्याचा सुगंध आहे. या गीतांमध्ये परमात्म्याचे प्रतिबिंब आहे.
श्री गुरुनानक देवजी यांच्या वाणीमध्ये जे मूल्य जपुजींचे आहे; ते इतर कोणाचेही नाही.जपुजी एकदम नवीन प्रगटन आहे; त्या अलौकिक जगताची. त्या जगताहून वापस आल्यानंतर त्यांनी जे वचन म्हटले; ते हेच आहे. त्या अलौकिक जगतातून या जगतामध्ये आल्यानंतर जी त्यांच्याकडून पहिली शब्द निर्मिती झाली; ते जपुजी आहे.
या घटनेला देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे.
नदीच्या तटावर रात्रीच्या अंधाऱ्या रात्री आपले सहकारी आणि सेवक मर्दाना यांच्यासोबत ते नदीच्या किनाऱ्यावर बसले होते.अचानक काही न सांगता ते नदीमध्ये गेले. मर्दाना विचारत होते, काय करत आहात? रात्र थंडीची आहे, अंधार आहे; तरी ते दूर नदीमध्ये निघून गेले. मर्दाना मागे मागे गेले. गुरुनानक देवजींनी डुबकी मारली.मर्दाना विचार करत होते की, क्षण दोन क्षणांमध्ये ते बाहेर येतील; मात्र ते बाहेर आले नाही. पाच-दहा मिनिट मर्दाना यांनी वाट पाहिली. मग ते शोधू लागले की, ते कुठे गेले. नंतर मर्दाना ओरडू लागले. नदीच्या किनाऱ्यावर आवाज देत होते. त्यांना असं वाटलं की, नदीची प्रत्येक लहर प्रतिध्वनी देत आहे की….. धैर्य ठेव ……. धैर्य ठेव.
परंतु श्री गुरुनानक देवजी यांची कोणतीही खबर नव्हती. मर्दाना पळत पळत गावात गेले. अर्ध्या रात्री लोकांना जागविले. लोकांची गर्दी जमा झाली.
श्री गुरुनानक देवजींना सर्व लोक प्रेम करत होते. सर्वांना श्री गुरुनानक देवजींमध्ये काही होण्याची संभावना वाटत होती. श्री गुरुनानक देवजीच्या उपस्थितीमध्ये सर्वांना सुगंध प्रतीत होत होता. सर्व गाव गोळा झाले. गर्दी गोळा झाली. सर्वांनी नदीमध्ये शोध घेतला; मात्र काहीही पत्ता लागला नाही. तीन दिवस झाले.
तिसऱ्या दिवशी अचानक श्री गुरुनानक देवजी नदीतून प्रगट झाले. जेव्हा ते नदीतून प्रगट झाले; तेव्हा जपुजी हे त्यांचे पहिले वचन होते. ही घोषणा त्यांनी केली.
श्री गुरुनानक देवजी जेव्हा तीन दिवस नदीमध्ये गेले; तेव्हा आख्यायिका अशी सांगितली जाते की, ते परमात्म्याच्या दरवाज्यावर प्रगट झाले. ईश्वराचा त्यांना साक्षात्कार, अनुभव झाला. ज्यांना ते साद देत होते, ज्यांचे ते गीत गात होते, ते त्यांच्या डोळ्यासमोर प्रगट झाले. ज्यांच्यासाठी ते गीत गात होते, जे त्यांच्या हृदयाच्या प्रत्येक धडकनसाठी तहान बनले होते. त्याला त्यांनी स्वतःच्या समोर अनुभवले. तृप्त झाले. तेव्हा परमात्म्याने त्यांना सांगितले, आता तू जा. जे मी तुला दिले आहे. ते लोकांमध्ये वाट. जपुजी ही त्यांची या जगाला पहिली भेट आहे; परमात्म्याचा साक्षात्कार, अनुभव घेऊन वापस आल्यानंतर.
जेव्हा तुम्ही मिटता; तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर जो असतो तो परमात्मा आहे. परमात्मा कुणी व्यक्ती नाही. परमात्मा निराकार शक्ती आहे.
श्री गुरुनानक देवजी परमात्मा होऊन प्रकट झाले. जसे परमात्मा तुमच्यासमोर प्रगट होतात; तुम्ही सुद्धा परमात्मा होता; कारण की त्याच्या अतिरिक्त दुसरे काहीही नाही.
श्री गुरुनानक देवजी वापस आले; परमात्मा होऊन आले. मग त्यांनी जे काही सांगितले; एक एक शब्द बहुमूल्य आहे. त्यांच्या एका एका शब्दाची आपण कितीही किंमत केली तरी किंमत अत्यंत कमी पडेल. त्यांचा एक एक शब्द वेद आणि वचन आहे.
इक ओंकार सतनाम
करता पुरखु निर्भवू निरवैर
अकाल मूरति अजुनी सैभं गुरु प्रसादी ||
तो एक आहे, ओंकार स्वरूप आहे. सतनाम आहे. कर्ता पुरुष आहे, भयापासून मुक्त आहे, वैरापासून मुक्त आहे, कालातीत मूर्ति आहे, अयोनी आहे, स्वयंभू आहे. गुरुच्या कृपेने तो प्राप्त होत असतो.
एकच आहे….. इक ओमकार सतनाम |
श्री गुरुनानक देवजी म्हणतात, त्याचे एकाचे जे नाव आहे; तेच ओंकार आहे. बाकी सर्व नाव तर माणसांनी दिलेले आहेत. सर्व आम्ही तयार केलेले आहेत. सांकेतिक आहेत. मात्र एक नाव जे आम्ही दिलेले नाही; ते ओंकार आहे. ते ओम आहे.
कारण की ओंकार त्याचे नाव आहे. जेव्हा सर्व शब्द लोप पावतात आणि चित्त शून्य होते. जेव्हा नदीवरील लाटा मागे जातात आणि सागरामध्ये माणूस लीन होतो. तेव्हा ओंकार ही ध्वनी ऐकू येते. ती आमची ध्वनी नाही. ती अस्तित्वाची ध्वनी आहे. ती अस्तित्वाची लय आहे. अस्तित्व होण्याचा मार्ग ओंकार आहे. ते कोणत्याही माणसाने दिलेले नाव नाही. याकरिता ओम याचा काही अर्थ होत नाही. ओम काही शब्द नाही. ओम ध्वनी आहे. ध्वनी सुद्धा अद्भुत आहे. त्याचा कोणताही स्रोत नाही. कुणी त्याला जन्म दिला नाही. अस्तित्वाच्या असण्यामध्येच तो लपलेला आहे. अस्तित्व असण्याच्या ध्वनी तो आहे.
जसे की जलप्रपात असतो. तुम्ही त्याच्या जवळ बसला तर पाण्याचा एक ध्वनी आहे; मात्र ती ध्वनी पाणी आणि डोंगर यांच्या संघर्षातून तयार होते. नदीच्या जवळ बसल्यानंतर नदीचा एक नाद ऐकू येतो; मात्र तो नाद नदी आणि किनाऱ्याच्या संघर्षातून तयार होतो. हवेचा एक झोका निघतो. वृक्षातून त्याचा आवाज होतो; मात्र तो हवा आणि वृक्षाच्या संघर्षातून तयार होतो. आम्ही जे काही बोलतो. संगीतज्ञ गाणे गातो. वीणाची तार छेडल्या जाते; मात्र सर्व काही संघर्षातून तयार होते. सर्व ध्वनी द्वैतमधून तयार होतात. ते ध्वनी त्याचे नाव नाही. त्याचे नाव तर तेच आहे. जेव्हा सर्व द्वैत हरवून जाते; तरीदेखील एक ध्वनी गुंजत राहतो…… तो ओंकार आहे.
(ओशो रजनीश,
एक ओंकार सतनाम,
प्रवचन:१ संस्करण:१९९१)
*संकलन आणि शब्दांकन:*
-डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.



